scorecardresearch

साऊथ इंडियन Curd Rice सह या उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा! पाहा सोपी मराठी रेसिपी

Curd Rice Marathi Recipe: उन्हाळा वाढत असताना ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. कसा बनवायचा हा साऊथ इंडियन स्पेशल कर्ड राईस पाहूया..

Curd Rice Recipe In Marathi Summer Special Cooling Dishes To Avoid Acidity Headache Marathi Kitchen Tips
साऊथ इंडियन Curd Rice सह या उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Curd Rice Recipe In Marathi: दुपारच्या जेवणासाठी रोज काय नवीन बनवायचं हा प्रश्न नेहमीच गृहिणींना पडलेला असतो. त्यातही नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी झटपट आणि टेस्टी काय बनवायचं या शोधात गृहिणी असतात. त्यातही आपलं जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. आतापर्यंत आपण प्लेन राईस, जिरा राईस, मसाले भात, बिर्याणी, पुलाव यांसारखे भाताचे अनेक प्रकार खाल्ले असतील…अशातच आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील ‘कर्ड राईस’ बनवून तुम्ही साऊथ इंडियन स्पेशल रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ खायला आवडेल. विशेष म्हणजे यातील दही उन्हाळ्यात तुमच्या शरीराला गारवा देण्यासाठी बेस्ट ठरु शकते, त्यामुळे उन्हाळा वाढत असताना ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा हा साऊथ इंडियन स्पेशल कर्ड राईस.

कर्ड राईस साहित्य (Curd Rice Ingredients)

2 कप तांदूळ, 1 कप दही, दोन कप पाणी, 1 चमचा मोहरी, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 5-6 कढीपत्ता, 3-4 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 तुकडा आलं, 1 चमचा तेल, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ

कर्ड राईस कृती (Curd Rice Recipe)

  • तुमच्या आवडीनुसार भात चिकट किंवा सुटा शिजवून घ्या
  • दह्यात थोडे पाणी मिसळून ते चांगल्या प्रकारे फेटून घ्या
  • कर्ड राईस करताना नेहमी फ्रेश दह्याचा वापर करा, अन्यथा दह्याच्या जास्त आंबटपणामुळे चव बदलु शकते
  • आता एका पातेल्यात तेल घाला. तेल तापल्यावर त्यात चणा डाळ, उडीद डाळ, मोहरी, कढीपत्ता, लाल हिरव्या मिरच्या आणि आलं घाला आणि मंद आचेवर चांगलं परतून घ्या
  • त्यानंतर परतलेलं मिश्रण तांदूळ आणि दह्यात एकत्र करुन फोडणीच्या पातेल्यात घाला. आणि वरुन थोडेसे मीठ घाला.
  • हे मिश्रण 3-4 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यानंतर गॅस बंद करा.
  • त्यानंतर कर्ड राईस एका प्लेटमध्ये काढून वरुन थोडी कोथिंबीरीची गार्निशिंग करा. गरमागरम कर्ड राईस नारळाच्या चटणीसह सर्व्ह करु शकता.

हे ही वाचा<< खरवस, बर्फीसारखं घट्ट दही घरी बनवा; विरजणाची गरजच नाही; ‘ही’ रेसिपी आहेच भारी

तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 17:30 IST
ताज्या बातम्या