Dahi batata Bhaji : आज कोणती भाजी करावी? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. दररोज तेच त्या भाजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना बटाटे आवडतात. आज आपण बटाट्यापासून बनवणारा एक स्वादिष्ट पदार्थ जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी दही बटाटा खाल्ला आहे का? हो, दही बटाटा हा अत्यंत स्वादिष्ट असून चवीला अप्रतिम वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दही बटाटा कसा बनवायचा?सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दही बटाटा कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहेत.

व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

Woman asks google strange questions to make everyday life easier video
VIDEO: “हात न लावता भांडी कशी घासायची?” महिलेने गूगलला विचारलेले भन्नाट प्रश्न ऐकून पोट धरून हसाल
Two robbers returned valuables to a delivery boy after he broke into tears video
चक्क चोरांनी दाखवली माणुसकी; मुलगा रडायला लागताच चोरीचं सामान केलं परत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Viral VIDEO: Man Slaps & Kicks Thief Caught Stealing Purse Inside Delhi Metro
VIDEO: “मी मरेन काका, मला जाऊ द्या” दिल्ली मेट्रोमध्ये चोराला रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच
best jugaad in monsoon rainy season made clip hanger for dry clothes from old strainer
Jugaad Video : पावसाळ्यात हा जुगाड करा! फक्त एका जुन्या चाळणीपासून बनवा कपडे सुकवण्याचे क्लिप हँगर
Makeup Tips for perfect gajra hairstyle
Makeup Tips : परफेक्ट गजरा कसा माळायचा? पाहा व्हायरल VIDEO
Palak Pulao Recipe
Palak Pulao Recipe : असा बनवा झटपट होणारा चवदार पालक पुलाव, भन्नाट रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Jugaad Video how to Paint plants Pots in just five minuts
Jugaad Video : पाच मिनिटांमध्ये अशा रंगवा घरच्या बागेतील कुंड्या, पाहा भन्नाट जुगाड
Masala Bhakri
Masala Bhakri : मसाला भाकरी कधी खाल्ली का? मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक मसाला भाकरी, पाहा VIDEO

साहित्य –

 • बटाटे
 • लाल तिखट
 • गरम मसाला
 • धणेपूड
 • जिरेपूड
 • हळद
 • मीठ
 • तेल
 • जिरे
 • आलं लसणाची पेस्ट
 • कढीपत्ता
 • बारीक चिरलेले कांदे
 • बारीक चिरलेले टोमॅटो
 • पाणी
 • कोथिंबीर

हेही वाचा : बाजारातील चिप्सऐवजी मुलांसाठी घरीच बनवा ‘नाचणीचे पौष्टिक चिप्स’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : कुरकरीत बेसन पापडी आता घरच्या घरी बनवा, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा, पाहा VIDEO

कृती

 • सुरुवातीला मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकळून घ्या.
 • एका प्लेटमध्ये दही त्यात लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि हळद टाका. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. दही मसाला तयार होईल.
 • त्यानंतर उकळलेले बटाटे सोलून दही मसाल्यात टाका आणि चांगले मिक्स करा.
 • त्यानंतर कढईत तेल गरम करा आणि गरम तेलात जिरे टाका.
 • त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाका.
 • त्यानंतर कढीपत्ता टाका
 • त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका.
 • चांगले परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो टाका.
 • त्यानंतर दही मसाल्यात एकत्रित केलेले बटाटे त्यात टाका.
 • त्यानंतर त्यात थोडे पाणी टाका
 • आणि त्यावर प्लेट ठेवून शिजू द्या.
 • शेवटी भाजी नीट शिजल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
 • दही बटाट्याची भाजी तयार होईल.

swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दही बटाट्याची चमचमीत भाजी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला ही रेसिपी बनवायची आहे” तर एका युजरने लिहिलेय, “वाह किती चविष्ठ भाजी दिसतेय. कमीत कमी मसाले आणि जास्त स्वादिष्ट” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी आजच घरी बनवायला सांगतो” काही युजर्सनी लिहिलेय की याला दम आलू म्हणतात.