Dahi Toast Video Recipe: तुम्ही बर्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेडचे पदार्थ खाल्ले असतील. विशेषतः बटर टोस्ट आणि गार्लिक ब्रेडची चव तर अनेकवेळा चाखली असेलच. पण यावेळी तुम्ही ही दही टोस्टची रेसिपी नक्की खाऊन पाहा. एकदा चव चाखल्यानंतर तुम्ही ही चव कधीही विसरू शकणारन नाही. फार काळ विसरू शकणार नाही.
ही दही टोस्टची रेसिपी तयार करणे फार सोपे आहे आणि काही मिनिटांमध्ये तयार केली जाते. एवढेच नाही तर हे तयार करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी सुगरण असण्याची गरज नाही. कारण ही इतकी सोपी आहे की कोणीही ती तयार करू शकते.चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी जी इंस्टाग्राम यूजरने आपल्या अकाऊंटवर शेअर केली आहे.
दही टोस्ट बनवण्यासाठी साहित्य
दही टोस्ट बनवण्यासाठी व्हाईट ब्रेड ३-४ स्लाईस, बेसन २ चमचे, दही १/२ कप, कांदा १/२ चिरलेला, मिरची पावडर १/४ छोटा चमचा, हळद पावडर एक चिमूटभर, तूप २ टेस्पून, मोहरी २ चमचे घ्या. १०-१२ कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या मधोमध कापून, २ चमचे पाणी आणि चवीनुसार मीठ आणि काळी मिरी. चला आता जाणून घेऊया दही टोस्ट बनवण्याची रेसिपी.
हेही वाचा – ऑफिसच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ मिळत नाही? मग झटपट बनवा ग्रीन स्मुदी! ‘ही’ घ्या रेसिपी
दही टोस्ट रेसिपी
दही टोस्ट बनवण्यासाठी प्रथम पीठ तयार करा. यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात तिखट, हळद, मीठ आणि काळी मिरी घालून चांगले मिसळा. आता त्यात बेसन घालून थोडे पाणी घालून पीठ बनवा. त्यात गुठळ्या दिसू नयेत हे लक्षात ठेवा. नंतर ब्रेडचे तुकडे पिठात बुडवून चांगले घोळून घ्या करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ब्रेडचे तुकडे तुमच्या आवडत्या आकारात कापून वापरू शकता.
हेही वाचा – नॉनव्हेजसाठी पर्याय शोधताय मग, बनवा स्वादिष्ट सोयबीन करी! शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम स्त्रोत
आता कढईत किंवा तव्यावर थोडे तेल गरम करा आणि त्यावर पिठात लेपित ब्रेड स्लाइस ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. यानंतर फोडणी बनवण्यासाठी एका छोट्या कढईत थोडे तेल गरम करा. नंतर या तेलात मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाका आणि थोडी तडतडू द्या. नंतर तयार टोस्ट वर ठेवा. यानंतर चिरलेल्या कांद्याने सजवा. गरमागरम दही टोस्ट तयार आहे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.