Instant Mango Coconut Laddu Recipe : आपल्यातील अनेकांचा लाडू हा पदार्थ आवडीचा आहे. एखाद्या शुभप्रसंगी तर खासकरून दिवाळीत बेसनाचे लाडू आवर्जून घरी बनवले जातात. बेसन, रवा, बुंदी, मेथी किंवा अगदी गोड खावंसं वाटलं तर आई शेंगदाण्याचा कूट करून त्याचे लाडू तुम्हाला खायला देते. सध्या आंब्यांचा सिझन सुरु असल्यामुळे एका व्हायरल व्हिडीओ चक्क आंब्याचे लाडू बनवले आहेत, तेही फक्त ३ साहित्यापासून. नक्की लाडू कसे बनवले आहेत चला पाहुयात…
साहित्य
- आंबे
- नारळाचा कीस (पावडर)
- कंडेन्स्ड मिल्क
कृती
- आंबे स्वच्छ धुवून त्याच्या बारीक तुकडे करून घ्या.
- एका ताटात नारळाचा किस, कंडेन्स्ड मिल्क आणि आंब्याचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यानंतर तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
- थंड करा आणि आस्वाद घ्या.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा ही रेसिपी व्हिडीओद्वारे @vythlove या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
