सणांचा आनंद घेण्यासाठी घरात गोड पदार्थ असणे खूप महत्त्वाचे असते. सणांचा रंग आणि आनंद गोडाशिवाय अपूर्ण राहतो. या सणांत पारंपरिक मिठायांमध्ये थोडा बदल करून काही नवीन पदार्थ बनवणेही मजेदार ठरते. असाच एक गोड पदार्थ म्हणजे खवा आणि नारळापासून बनवलेली बर्फी. ही सुगंधी व सुंदर दिसणारी बर्फी खूप चविष्ट लागते. एकदा तुम्ही ती चाखली की, तुम्हाला ती पुन्हा खावीशी वाटेल. ती घरी सहज बनवता येते आणि सणांसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी उत्तम आहे.

ही बर्फी केवळ चविष्टच नाही, तर दिसायलाही सुंदर आहे. लहान तुकडे करून, ती हवाबंद डब्यात ठेवली तरी ती ताजी राहते. त्यात काजू आणि पिस्ता घातल्याने त्याची चव चांगली वाढते. तसेच, ही बर्फी सणांच्या निमित्ताने मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांना भेट म्हणून देता येते.

खवा आणि नारळ बर्फीसाठी लागणारे साहित्य :

  • २५० ग्रॅम खवा
  • १०० ग्रॅम ताजा नारळ
  • १०० ग्रॅम साखर
  • २ मोठे चमचे तूप
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • काजू व पिस्ता सजावटीसाठी

बर्फी कशी तयार करायची?

स्टेप १ :
सर्वप्रथम एका पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात खवा घाला आणि मध्यम आचेवर २-३ मिनिटे ढवळत भाजून घ्या. खवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात नारळ किसून खोबरे टाका आणि चांगले मिसळा. मिश्रणात नारळ घातल्यामुळे बर्फीला सुगंध आणि चव मिळते.

स्टेप २ :
नंतर त्यात साखर घाला आणि सतत ढवळत राहा. काही वेळाने साखर पूर्णपणे वितळेल आणि मिश्रणात मिसळेल. नंतर अर्धा चमचा वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा. आता प्लेटवर थोडे तूप घाला आणि मिश्रण पसरवा. वर काजू व पिस्ता घाला आणि हलके दाबा, जेणेकरून ते मिश्रणाला चांगले चिकटतील. मिश्रण पूर्णपणे थंड होईपर्यंत वाट पाहा. थंड झाल्यावर तुमच्या आवडीनुसार लहान तुकडे करा आणि सर्व्ह करा.

ही बर्फी बनवायला सोपी असून, सणाच्या खास प्रसंगी लगेच तयार करता येते. खवा आणि नारळाचे सुंदर मिश्रण, साखरेचा गोडवा व वेलचीचा सुगंध यांमुळे ही बर्फी सर्वांसाठी एक मेजवानी बनेल. तसेच, ही बर्फी घरी सणांसाठी एक सुंदर भेट म्हणून आदर्श आहे. बर्फी ताजी राहण्यासाठी ती हवाबंद डब्यात ठेवणे महत्त्वाचे आहे.

सणांच्या या उल्हसित करणाऱ्या क्षणांना अजून खास बनवण्यासाठी ही खवा आणि नारळाची बर्फी ट्राय करा. तिचा सुगंध आणि चव प्रत्येकाच्या मनाला भावेल आणि घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणेल.