scorecardresearch

Gajar Paratha: नाश्त्यामध्ये पौष्टिक आणि चविष्ट पराठा खायचा असेल तर एकदा गाजर पराठा नक्की खाऊन पाहा

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन के, आहारातील फायबर यांसारखे पोषक घटक असतात

gajar paratha simple ways to make carrot paratha know recipe
नाश्त्यासाठी गाजर पराठा कसा बनवायचा (फोटो सौजन्य – फ्रिपीक )

Gajar Paratha Recipe: हिवाळ्याची चाहूल लागताच अनेकांना नाश्त्यात स्वादिष्ट पराठा खायला आवडतो. पराठ्याचे असंख्य प्रकार आपल्याला त्याकडे आकर्षित करतात. जर तुम्हाला हिवाळ्यात पराठा खायला आवडत असेल तर तुम्ही पौष्टिकतेने युक्त गाजर पराठा करून पाहू शकता. खरं तर, थंडीच्या ऋतूमध्ये अनेक हंगामी भाज्या असतात ज्यातून पराठा बनवायला आवडतो. जसे मुळा पराठा, मेथी पराठा आणि वाटाणा मराठा इ. त्यामुळे जर तुम्हालाही गाजरचे पराठे खायचे असतील तर तुम्ही ते कमी वेळात सहज बनवू शकता. गाजर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गाजरापासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात. खरंतर या ऋतूत लोकांना गाजराचा हलवा खायला सर्वाधिक आवडतो. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन के, आहारातील फायबर यांसारखे पोषक घटक असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया गाजर पराठे कसे बनवायचे.

नाश्त्यासाठी गाजर पराठा कसा बनवायचा

Viral Video Of Manchurian Making Upsets Internet
मंच्युरिअन खायला आवडतात का? मग एकदा हा व्हिडीओ बघाच! पुन्हा मंच्युरिअन खाण्यापूर्वी १०० वेळा कराल विचार
man carrying heavy tray of breads on his head while cycling in busy traffic in egypt people surprised watch
भररस्त्यात डोक्यावर मोठा ब्रेडचा ट्रे ठेवून सायकल चालवतोय ‘हा’ व्यक्ती, तरुणाचा बॅलन्स पाहून व्हाल थक्क!
Street vendor’s pineapple momos fail to impress netizens watch video
‘अननसाचे मोमो’ कधी खाल्ले आहेत का? नसेल तर ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा, विचित्र प्रयोग पाहून संतापले लोक
Bitter gourd Health Benefits
कडू कारले आरोग्यासाठी खूपच उपयुक्त; जाणून घ्या एकापेक्षा एक गुणकारी फायदे

साहित्य-

  • किसलेले गाजर
  • गव्हाचे पीठ
  • आले
  • जिरे पावडर
  • हिरवी मिरची
  • मिरची पावडर
  • हिरवी धणे
  • मीठ
  • तेल

कृती

गाजर पराठा बनवण्यासाठी प्रथम एक मोठे भांडे घ्या

  • किसलेले गाजर, गव्हाचे पीठ, आले, जिरेपूड, चिरलेली हिरवी मिरची, तिखट, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिसळा.
  • आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.
  • जास्त पाणी न घालण्याची काळजी घ्या कारण या टप्प्यावर गाजरला आपोआप पाणी सुटेल
  • आता पिठाचा गोळा करून गोलाकार लाटून घ्या.
  • मध्यम आचेवर पॅन गरम करा.
  • पराठा दोन्ही बाजूंनी समान रीतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करा.
  • शिजवताना पुरेशा प्रमाणात तूप किंवा तेल लावा.
  • गाजर पराठा तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gajar paratha simple ways to make carrot paratha know recipe snk

First published on: 21-11-2023 at 19:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×