Keshar mawa modak recipe in marathi: यंदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी असणार आहे. त्यामुळे सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे. कोणाच्या घरी सजावट तर मंडळातील सार्वजनिक गणपतीचे आगमन होताना दिसते आहे. तर अशातच गणपती बाप्पाला रोज काय नैवैद्य द्यायचा याचं प्लॅनिंग अनेक महिला करताना दिसत आहेत. तर तुम्ही देखील हा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आलो आहोत. बाप्पाला मोदक आवडतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जर आपण मोदक बनविण्याचा बेत आखला असेल तर रोजचे पारंपरिक उकडीचे मोदक करण्यापेक्षा झटपट बनणारे केशर मावा मोदक तयार करून पाहा… केसर माव्याचे मोदक साहित्य खवासाखरपिस्तावेलची पावडरकेशरदूध केसर माव्याचे मोदक कृती १. केसर माव्याचे मोदक बनवण्यासाठी एका भांड्यात दूध आणि साखर एकत्र करून बाजूला ठेवा. २. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये खवा ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या. ३. मध्ये मध्ये ढवळत राहा. भाजल्यावर त्यात केशर दूध घालून मध्यम आचेवर २ मिनिटे राहूद्या. ४. माव्याचे मिश्रण नीट मिक्स करून प्लेटमध्ये काढून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊद्या. ५. थंड झाल्यावर हाताने मॅश करा. त्यात बारीक केलेली साखर, वेलची पावडर आणि पिस्ता घाला. ६. नीट मिक्स केल्यानंतर मोदक बनवण्यासाठी साचा घ्या आणि त्यात तूप लावा. हेही वाचा >> गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत; प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा, जाणून घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी ७. आता त्यात मावा भरून नीट दाबून घ्या. मोदक साच्यातून काढा. सर्व माव्याचे मोदक त्याच पद्धतीने तयार करा. तुमचे केसर मावा मोदक तयार आहे