Ganpati Naivedya Recipes: गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात तर हा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरोघरी फुलांची आरास सजलेली असते. धूप-दीपांचा सुगंध दारोदारी दरवळत असतो. यावेळी बाप्पासाठी नैवेद्य, प्रसाद बनवला जातो. आज आम्ही तुम्हाला प्रसादासाठी बदाम पोळी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
बदाम पोळी साहित्य –
बदाम १ वाटी, साखर १ वाटीला थोडी कमी
तूप अर्धा मोठा चमचा
वेलची १० ग्रॅम, केशराच्या थोड्या काड्या
मैदा २ वाटी, मीठ चवीपुरते, पाणी.
बदाम पोळी कृती-
बदाम दुधात १ ते २ तास भिजत घाला. बारीक वाटून घ्या. वाटलेल्या बदामात साखर, केशर, वेलची पूड मिसळा.
पॅनमध्ये तूप घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात बदाम-साखरेचे मिश्रण ओता. त्याचा गोळा होईपर्यंत मंद आचेवर हलवत रहा.
गोळा झाल्यावर मिश्रण थंड होऊ द्या. भांड्यावर झाकण ठेवा. थोडे मीठ, तेल घालून मैदा भिजवा.. पिठाचे छोटे गोळे करा, बदामाच्या मिश्रणाचेही तसेच गोळे करा.
हेही वाचा >> Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
मैद्याची पुरी लाटून घ्या, त्यावर बदामाचा गोळा ठेवा. तो गोळा पूर्ण झाकला जाईल असे बघा. मैदा लावून पोळी लाटा. तुप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. अशाप्रकारे आपली बदाम पोळी तयार आहे.