scorecardresearch

Premium

गोल्डन सूप; भूक लागल्यानंतर हे सूप नक्की ट्राय करुन बघा, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

Healthy soup recipe: अतिसाराचा त्रास किंवा आजारी असताना डॉक्टर देखील आपल्याला सूप पिण्याचा सल्ला देतात.चला तर पाहुयात हे गोल्डन सूप कसे तयार करायचे.

golden healthy soup
पौष्टीक सूप रेसिपी

सकाळचा नाश्ता केल्यानंतर मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी काही जण चहा, कॉफी, फास्ट फूड किंवा एखाद्या पाकिटबंद खाद्यपदार्थाचे सेवन करतात. पण हा पर्याय आरोग्यासाठी पौष्टिक नाही. याऐवजी तुम्ही घरच्या घरी हेल्दी सूप तयार करून पिऊ शकता. कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या सूप रेसिपीची माहिती आपण पाहणार आहोत. अतिसाराचा त्रास किंवा आजारी असताना डॉक्टर देखील आपल्याला सूप पिण्याचा सल्ला देतात.चला तर पाहुयात हे गोल्डन सूप कसे तयार करायचे.

गोल्डन सूप साहित्य –

  • २ मोठे टोमॅटो चिरलेले, १ बारीक कांदा चिरून
  • १ मध्यम आकाराचे गाजर चिरून, २ लवंगा
  • २ मिरी दाणे, १ छोटा तुकडा दालचिनी
  • चवीनुसार मीठ आणि साखर, बटर

गोल्डन सूप कृती –

प्रेशर कुकरमध्ये बटर वितळवून घ्या, त्यात लवंग, मिऱ्या, दालचिनी टाका. त्यानंतर चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परता. यामध्ये गाजराचे तुकडे घालून पुन्हा मिनिटे परता. नंतर चिरलेला टोमॅटो घालून मिश्रणाला एक वाफ आणा. चवीनुसार मीठ आणि साखर घालून दीड कप पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर झाकण लावून २ शिट्या झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ब्लेण्ड करा. नंतर काढईत ओतून आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी आणा. अशा प्रकारे आपले गोल्डन सूप तयार आहे.

In Viral Video Girl Hair Stuck Inside Swing In Gujarat
केस मोकळे सोडून तरुणी बसली आकाशपाळण्यात अन् होत्याचं नव्हतं झालं; जत्रेतील थरारक Video
risk & return
Money Mantra: रिस्क आणि रिटर्नचा मेळ कसा साधावा?
iPhone 15 Pro Kamla Nagar viral video
iPhone 15 च्या डिलिव्हरीला उशीर, ग्राहकाने दुकानदाराला केली गंभीर मारहाण, भांडणादरम्यान कपडे फाडल्याचा VIDEO व्हायरल
mother buffalo sacrifice viral video
शेवटी आई ती आईच..! बाळाला वाचवण्यासाठी म्हशीने स्वतःचा जीव लावला पणाला, एकटी सिंहांच्या कळपाला भिडली पण…

हेही वाचा – रताळ्याचा कीस! आषाढी एकादशी व्रत करणार्‍यांसाठी खास उपवास स्पेशल रेसिपी!

गरम सूप ब्रेड क्रुटोनबरोबर खायला देऊ शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news fitness tips healthy golden soup recipes for your appetite in marathi must try srk

First published on: 10-06-2023 at 14:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×