जुन महिना सुरू झाला तरीसुद्धा लोकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. आज आम्ही तुम्हाला हेल्दी ज्युसचा प्रकार सांगणार आहोत, बीट गाजर ज्यूस.
बीट हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. बीटमध्ये लोह असते. जे शरीरासाठी फायदेशीर आहे तर गाजर सुद्धा हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गाजर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अनेकदा काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, कांदा यापासून बनविण्यात येणारी कोशिंबीरही हेल्दी असते. पण आज आपण बीट गाजर ज्यूस घरी कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Sankashti Chaturthi Special: ज्वारीच्या पिठाचं पौष्टिक आणि खुशखुशीत थालीपीठ; एकदा खाल तर खातच राहाल..

साहित्य

  • १ मध्यम आकाराचे गाजर
  • १ छोटे बीट
  • १ छोटा टोमॅटो
  • जिरेपूड
  • दालचिनी पूड

हेही वाचा : हेल्दी इंद्रधनुष्यी चाट कधी खाल्ली का? मग एकदा ट्राय कराच, जाणून घ्या रेसिपी

कृती

  • वरील सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्या
  • त्यानंतर या मिश्रणाला गाळा
  • अर्धा ग्लास मिश्रणामध्ये पाव ग्लास पाणी घाला

(टीप – हे ज्यूस ताजेच घ्या. आधी करून ठेवू नका)

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make beetroot carrot juice at home read easy recipe healthy lifestyle ndj
First published on: 07-06-2023 at 15:51 IST