Sunday Special: रविवार म्हणजे सुट्टी असं समीकरण आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये अगदी फिट्ट झालं आहे. आठवड्याभराचा थकवा घालवण्यासाठी तर कुटुंबासह एक दिवस मज्जा करण्यासाठी लोक रविवारची वाट पाहत असतात. काहीजणांकडे रविवारी मस्त नॉन व्हेजचा बेत असतो. नॉर्मली लोक सकाळी नाश्ताला इडली-वडा, पोहे-उपमा असे पदार्थ खात असतात. त्यात पुन्हा रविवारी सकाळी हे पदार्थ खायला अनेकांना कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळं खायला मिळालं तर किती बरं होईल असा विचार बऱ्याच वेळा तुमच्या डोक्यात आला असेल. अशा वेळी तुम्ही हरभऱ्याच्या डाळीपासून तयार केल्या जाणाऱ्या खुशखुशीत डाळवड्यांचा पर्याय निवडू शकता. या खमंग पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही खास तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.

साहित्य :

  • २ वाट्या हरभऱ्याची डाळ
  • तांदळाची पिठी
  • १०-१२ लसूण पाकळ्या
  • ४ हिरव्या मिरच्या
  • अर्धा जुडी कोथिंबीर
  • मीठ, हळद आणि साखर चवीपुरते
  • तळणीसाठी तेल

कृती :

  • रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजत ठेवावी. ती सकाळी उपसून बारीक वाटावी.
  • एका भांड्यात तेलाची फोडणी करुन त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे व हळद घालून वाटलेली डाळ घालावी.
  • त्यामध्ये लसूण ठेवून टाकावी.
  • कोथिंबीर बारीक चिरुन चवीपुरते मीठ व साखर घालावी.
  • नंतर थोडासा पाण्याचा हबका मारुन वर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
  • पुढे भांडे खाली उतरवून ठेवावे. थंड झाल्यावर मिश्रणाचे पेढ्याएवढे चपटे वडे करावेत.
  • तांदळाच्या पिठीत कडकडीत तेलाचे मोहन घालावे.
  • थोडीशी हळद, लाल तिखट व मीठ घालून अगदी पातळ भिजवावे.
  • त्यानंतर या पिठात वडे बुजवून लालसर तळावेत.

आणखी वाचा – इडलीच्या भांड्यात झटपट बनवा खमंग पालक ढोकळा, रेसिपी आताच सेव्ह करुन ठेवा

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

डाळी या प्रथिन्यांच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहेत. त्यामुळे आहारामध्ये डाळींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. हरभऱ्याच्या डाळीपासून तयार होणारे पौष्टिक वडे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हिरव्या चटणीसह किंवा टॉमेटो सॉसबरोबर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. रेसिपी वाचून हा पदार्थ नक्की बनवा आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.