Mango cake recipe eggless : वाढदिवस असो किंवा आनंदाची बातमी तोंड गोड करायला मिठाई, पेस्ट्री किंवा अगदी केक तर आवर्जून आणला जातो. केकमध्ये चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच आदी वेगवेगळ्या चवीचे केक बाजारात उपलब्ध असतात. सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. त्यामुळे आपण आंब्याचा केक कसा बनवणार याची रेसिपी बघणार आहोत…

साहित्य

  • रवा
  • आंबा
  • बेकिंग सोडा
  • बेकिंग पावडर
  • दूध
  • बदामाचे तुकडे

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • मिक्सरमध्ये १५० ते १८० ग्रॅम रवा बारीक करून पावडर करून एका बाउलमध्ये काढून घ्या.
  • नंतर आंब्याचे तुकडे (१ कप) मिक्सरच्या भांड्यात घाला आणि साखर, १/४ तूप घालून मिश्रण तयार करून घ्या आणि बाउलमध्ये १/२ कप दूध बरोबर टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर झाकण ठेवून ३० मिनिटे तसेच ठेवून द्या.
  • १/२ बेकिंग सोडा, १/२ बेकिंग पावडर, १/४ कप दूध घालून मिक्स करा.
  • तयार बॅटर केक बनवण्याच्या भांड्यात पसरवून घ्या आणि वरून बदामाचे तुकडे वरून सजावटीसाठी घाला.
  • ओव्हनचं तापमान 170°C ठेवून पदार्थ ३० ते ४० मिनिटे बेक करा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा ही रेसिपी व्हिडीओद्वारे @butterymoods या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.