mix vegetable cutlet : सध्याच्या थंडगार वातावरणामध्ये आपल्याला हेल्दी आणि चवदार काही तरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण कटलेटचा आहारामध्ये समावेश करू शकतो. आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल साधणाऱ्या हेल्दी कटलेटच्या वेगवेगळ्या रेसिपी सध्या घराघरात लोकप्रिय होत आहे. तसेच ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी सुद्धा आहे. चला तर जाणून घेऊयात घरच्या-घरी हेल्दी आणि चवदार कटलेट कसे तयार करायचे ते…

साहित्य

  • १ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • ½ चमचा हळद पावडर
  • १ चमचा लाल मिरची पावडर (चवीनुसार कमी-जास्त करा)
  • ½ चमचा जिरे पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • १ उकडलेला बटाटा, मॅश केलेला
  • १ मोठा चमचा लिंबाचा रस
  • चिरलेली कोथिंबीर
  • २-३ मोठे चमचे तांदळाचे पीठ (मिश्रण घट्ट करण्यासाठी)
  • रवा (कोटिंगसाठी)
  • शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
  • चवीनुसार मीठ

व्हिडीओ बघण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

कृती

  • एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात कांदा नरम होईपर्यंत परतून घ्या.
  • आले-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतून घ्या.
  • चिरलेल्या भाज्या घालून ३ ते ४ मिनिटे शिजवा.
  • हळद, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ घाला.
  • मिश्रण चांगले मिसळा, थोडे पाणी घालून झाकण ठेवून भाज्या नरम होईपर्यंत, पण किंचित कुरकुरीत राहतील अशा शिजवा.
  • गॅस बंद करा आणि त्यात मॅश केलेला बटाटा, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. चांगले मिक्स करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • थंड झाल्यावर, तांदळाचे पीठ घालून मऊ पीठ मळून घ्या.
  • कटलेटचा आकार द्या, रव्यामध्ये दोन्ही बाजू बुडवून घ्या.
  • आणि गरम तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  • हिरवी चटणी किंवा केचपसोबत गरम सर्व्ह करा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @muchfoodgoa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.