Premium

असे बनवा टेस्टी हरियाली पनीर कबाब; पहा सोपी रेसिपी

आज आपण हरियाली पनीर कबाब कसे बनवायचे, हे जाणून घेणार आहोत.

how to make Paneer Kabab Recipe food news
(Photo : myfood_journall, Instagram)

आपल्यापैकी अनेकांना पनीर खायला आवडते. पनीरची भाजी, पकोडे, कटलेट आपण आवडीने खातो. यात पनीर कबाबचे तर अनेकजण फॅन असतील. पनीर कबाबचे अनेक प्रकार आहे. हरियाली पनीर कबाब हे विशेष प्रसिद्ध आहे.
हरियाली पनीर कबाब हे जितके टेस्टी असते तितकेच हेल्दी असतात. हरियाली पनीर कबाब हा असा मेन्यू आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. आज आपण हरियाली पनीर कबाब कसे बनवायचे, हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Puran Poli Recipe : टेस्टी खव्याची पुरणपोळी कधी खाल्ली का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

साहित्य –

२०० ग्रॅम पनीर
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
मूठभर पुदिन्याची पाने
१ हिरवी मिरची
१ चमचा आल्याचा कीस
१ चमचा चाट मसाला
अर्ध्या लिंबाचा रस.

हेही वाचा : ऑफिसच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ मिळत नाही? मग झटपट बनवा ग्रीन स्मुदी! ‘ही’ घ्या रेसिपी

कृती-

प्रथम कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आले, चाट मसाला आणि लिंबाचा रस एकत्र करा

हे सर्व मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.

त्यात पनीर घालून सगळे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या.

तयार मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून घ्या.

प्रत्येक गोळा हाताने चपटा करून बार्बेक्यू ग्रिल/नॉनस्टिक पॅनमध्ये दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 16:56 IST
Next Story
ऑफिसच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ मिळत नाही? मग झटपट बनवा ग्रीन स्मुदी! ‘ही’ घ्या रेसिपी