Ukdiche Modak Recipe : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान तुम्ही गणपतीच्या आवडीचे मोदक करणार आहात का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण उकडीचे मोदक कसे करायचे, याविषयी जाणून घेणार आहोत. अनेकांना उकडीचे मोदक करताना मोदक फुटण्याची भीती वाटते पण आज आम्ही तुम्हाला एक सोपी रेसिपी सांगणार आहोत आणि त्यासह काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे मोदक फुटणार नाही.

साहित्य

  • तांदूळ
  • पाणी
  • तूप
  • मीठ
  • खसखस
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • गुळाचा किस
  • सुका मेवा
  • जायफळ
  • वेलची
  • गरम दुधामध्ये घातलेले केशर

कृती

उकड (तांदळाचे पीठ) कसे तयार करावे?

  • एक वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्या.
  • त्यात पाणी टाका आणि चार ते सहा तास हे तांदूळ पाण्यात भिजू घाला. रात्रभर तांदूळ पाण्यात भिजू घातले तरी चालेल.
  • त्यानंतर त्यातील पाणी नीट चाळून घ्या. त्यानंतर हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करा.
  • बारीक केलेल्या तांदूळमध्ये थोडं पाणी घाला व पुन्हा बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करा.
  • आणि त्या कढईवर पुन्हा एक कढई ठेवा ज्याला आपण डबल बॉयलिंग पद्धत म्हणतो.
  • कढईवर ठेवलेल्या कढईमध्ये एक चमचा तूप टाका
  • आणि त्यानंतर बारीक केलेले तांदळाचे पीठ त्यात टाका.
  • त्यानंतर त्यात थोडे मीठ टाका आणि मिश्रण एकत्र करा.
  • पीठ हळू हळू घट्ट होईल.
  • त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या.
  • वाफ आल्यानंतर उकड तयार होईल.

हेही वाचा : Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू

Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
ganesh chaturthi 2024 bhog for ganpati bappa naivedya recipes in marathi
बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा? तुम्हालाही हा प्रश्न असेल तर, जाणून घ्या बाप्पाचे आवडते १० पदार्थ
Ganpati Naivedya Recipes how to make semolina barfi ravyachi barfi prasad recipe
Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
ganpati naivedya recipes how to make badam poli prasad recipe
Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला बनवा बदाम पोळी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
Aloo poha paratha recipe
पोहे अन् कच्चा बटाटा वापरून झटपट बनवा खमंग खरपूस नाश्ता, दही आणि लोणच्याबरोबर खा चविष्ट पराठा
Rasili aaloo gobhi recipe in Marathi flower vegetable recipe in marathi
१० मिनिटांत बनवा झणझणीत खानदेशी स्टाईल ‘रसीली आलू गोभी’; नोट करा सोपी रेसिपी
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सारण कसे तयार करावे?

  • सारणासाठी एक दुसरे पातेले घ्या. त्यात तूप टाका. त्यानंतर त्यात खसखस टाका.
  • खसखस चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर एक वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घ्या आणि अर्धा वाटी गूळाचा किस घ्या. त्यानंतर चांगले परतून घ्या.
  • हे सारण कोरडे होईपर्यंत परतून घ्या.
  • तुम्ही यामध्ये सुका मेवा टाकू शकता.
  • त्यानंतर गॅस बंद करा.
  • त्यानंतर सारण एका प्लेटमध्ये काढा आणि त्यावर जायफळ किसून टाका.
  • तुम्ही वेलची पुड सु्द्धा टाकू शकता.

मोदक कसे भरावे?

  • त्यानंतर बाजूला ठेवलेली उकड घ्या आणि हाताने नीट मळा.
  • त्याचे छोटे छोटे गोळे करा.
  • हा गोळा गोल गोल फिरवा आणि त्यानंतर हाताने या गोळ्याची पारी तयार करा.
  • मोदकाच्या पारीला कळा पाडून घ्या. गरज पडली तर बोटांना तूप लावा
  • त्यानंतर त्यात सारण भरा.
  • कळा एकाबाजूला दाबून घ्या आणि मोदक पॅकबंद करा.
  • त्यानंतर असे सर्व सर्व मोदक भरा.

मोदक कसे वाफवून घ्यावे?

  • एक पातेले घ्या. पाणी टाका. त्यात प्लेट ठेवा.
  • त्या प्लेटवर स्वच्छ ओला रुमाल ठेवा
  • या रुमालवर एकमेकांना न चिकटता मोदक ठेवा.
  • गरम दुधामध्ये घातलेल्या केशराची एक एक काडी या मोदकावर ठेवा आणि झाकण लावून दहा मिनिटे हे मोदक वाफवून घ्या.
  • तुमचे सुरेख व सुंदर असे उकडीचे मोदर तयार होईल.

टिप्स

  • नारळ पांढेशुभ्र असेल तर सारण उत्तम बनते.
  • गूळ खूप जास्त चिकट व कडक असू नये, नाहीतर सारण बिघडू शकते.
  • उकडीचे मोदक करताना शक्यतो आंबेमोहोर तांदूळ वापरावा.
  • अधिक चांगल्या चवीसाठी हळदीच्या पानांमध्ये मोदक उकडावे.
  • मोदक पात्रात मोदक ठेवताना ते एकमेकांना चिकटणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही उकडीच्या मोदकाला चमच्याने कळ्या पाडू शकता.
  • मोदक भरताना बोटांना तूप लावा ज्यामुळे नीट मोदक भरता येईल.