लापशी हा पदार्थ आपल्यासाठी नवीन नाही. पौष्टिक आणि आरोग्यदायी असलेला हा पदार्थ कित्येक लोक आवडीने खातात. सहसा लापशी ही गोड असते पण तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट लाप्शी देखील तयार करू शकता. ही लापशी आरोग्यादायी आहेच पण चवीला देखील अप्रतिम असते. ही रेसिपी बनवायाला अतिशय सोपी आहे. तुम्ही आरोग्यादायी पदार्थ शोधत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मग वाट कसली पाहाताय लिहून घ्या सोपी रेसिपी.
तिखट लापशी रेसिपी
साहित्य : एक वाटी लापशीचा दलिया, १-२ लहान कांदे, एक टोमॅटो, दोन मिरच्या, पाव वाटी मका, पाव वाटी किसलेले गाजर




हेही वाचा – तुम्ही दही टोस्ट कधी खाऊन पाहिला आहे का? नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, सोपी, चवीष्ट आहे रेसिपी
कृती – एका कढईत तेल गरम करा त्यात बारीक चिरलेल्या भाज्या परतून घ्या. कुकरला लापशी शिजवून घ्या. शिजलेली चवीनसार मीठ, हळद, तिखट शिजवा. कोथिंबीरने सजवा. तुमची लापशी खाण्यासाठी तयार आहे. हा पदार्थ कमीत कमी तेलात बनवता येतो त्यामुळे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.