viral samosa bhel : भेळ हा बहुतांश लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली, भूक लागली तर स्वस्तात मस्त मिळणारा पदार्थ म्हणजे भेळ. अगदी कोणत्याही ऋतूमध्ये भेळ खाण्याचा आपण आनंद लुटू शकतो. तुम्ही आत्तापर्यंत सुकी आणि ओली भेळ खाल्ली असेल ना. पण, आज व्हायरल व्हिडीओत समोसा भेळची रेसिपी दाखवण्यात आली आहे.

साहित्य

  • ३ समोसा
  • कुरमुरे
  • शेंगदाणे
  • शेव आणि चिवडा
  • खायची मूग डाळ
  • कांदा, टोमॅटो, मिरची
  • मीठ, चाट मसाला, तिखट मसाला
  • लिंबाचा रस
  • चिंच आणि पुदिन्याची चटणी
  • कोथिंबीर

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

samosa bhel

कृती

  • ३ समोसे कुस्करून घ्या.
  • नंतर त्यात कुरमुरे, शेंगदाणे, शेव, चिवडा, खायची मूग डाळ, कांदा, टोमॅटो, मिरची , मीठ, चाट मसाला, तिखट मसाला, लिंबाचा रस, चिंच आणि पुदिन्याची चटणी घालून एकजीव करून घ्या. त्यानंतर वरून कोथिंबीर घाला. अशाप्रकारे तुमची सामोसा भेळ तयार.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ranjitahomekitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.