Independence Day 2024 Recipe : सध्या सगळीकडे १५ ऑगस्टची जय्यत तयारी सुरू आहे. कोणता ड्रेस घालावा इथपासून कुठे फिरायला जावे इथपर्यंत सर्व जण प्लॅनिंग करताना दिसताहेत पण त्या दिवशी हटके काय खायचं, हा विचार तुम्ही केला का? आज आपण एका अशा रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत, ही रेसिपी तुम्ही १५ ऑगस्टला नक्की बनवू शकता.सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिरंगा डोसा कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे. विशेष म्हणजे हा डोसा तयार करताना कोणताही रंग वापरला नाही. जाणून घेऊ या रेसिपी व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे - तिरंगा डोसा रेसिपी साहित्य तीन कप तांदूळएक वाटी उडीद डाळएक चमचा मेथी दाणेगाजरकोथिंबीरमीठपाणी हेही वाचा : Nag Panchami 2024: नागपंचमी नैवेद्य! यंदा कोल्हापूरच्या पारंपरिक स्टाईलमध्ये करा ‘गव्हाचा उंडा’; रेसिपी लगेच नोट करून घ्या कृती सुरुवातीला तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्रित करावेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.त्यानंतर स्वच्छ पाण्यात एकत्रित केलेले तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे सहा तासांसाठी भिजवून घ्यावेत.पाणी इतके टाकावे की कमी पडणार नाही.सहा तासानंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करावे आणि पेस्ट तयार करावी. रात्रभर ही पेस्ट झाकून ठेवावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाळीदार पेस्ट तयार होईल.त्यानंतर चार पाच गाजर घ्या. या गाजरांची बारीक पेस्ट तयार करावी. त्यानंतर कोथिंबीर घ्यावी. आणि कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून मिक्सरमधून बारीक करावी.गाजर आणि कोथिंबीरच्या पेस्टमध्ये थोडे थोडे डोसाचे पीठ मिक्स करावे.आता तुमच्याकडे तीन रंगाचे पेस्ट तयार होईल. पांढरा, केशरी आणि हिरवा. त्यात थोडे पाणी टाकावे.या तीन रंगाचे पेस्ट वापरून आपण तिरंगा डोसा तयार करू शकतो.त्यानंतर कमी आचेवर तवा ठेवा.त्यावर केशरी रंगाची पेस्ट सुरुवातीला टाका. त्यानंतर पांढऱ्या रंगाची पेस्ट टाका आणि त्यानंतर हिरव्या रंगाची पेस्ट टाका. त्यानंतर त्यावर एक चमचा तेल टाका.कमी आचेवर हा डोसा भाजून घ्या.अप्रतिम असा तिरंगा डोसा तयार होईल. पाहा व्हायरल व्हिडीओ Niti's Cooking या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "तिरंगा डोसा" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "हटके रेसिपी" तर एका युजरने लिहिलेय, "खूप सुंदर" आणखी एका युजरने लिहिलेय, "मी नक्की ही रेसिपी ट्राय करेन"