Rice Vada Recipe: सध्या गणेशोत्सव असल्याने मोदक, मिठाई असे अनेक गोड पदार्थ सतत खाऊन तुम्हाला कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही चविष्ट आणि झणझणीत तांदळाच्या वड्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग लिहून घ्या साहित्य आणि कृती
तांदळाचे वडे बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
- ४-५ उकडलेले बटाटे
- १ वाटी बेसन पीठ
- ४-५ हिरव्या मिरच्या
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा चाट मसाला
- कांदा (बारीक चिरलेला)
- चिमूटभर हळद
- आल्याचा छोटा तुकडा
- १/२ वाटी कोथिंबीर
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
तांदळाचे वडे बनविण्याची कृती:
हेही वाचा: फक्त दहा मिनिटांत झटपट बनवा खजूराचे मोदक; लिहून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम वडे करण्याच्या ६-७ तास आधी तांदूळ भिजत ठेवा.
- ठराविक ६-७ तास तासांनंतर तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- आता उकडलेले बटाटे सोलून, त्याचे बारीक तुकडे करून घ्या आणि त्यात मिरची, आले एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
- आता तयार पेस्टमध्ये तांदळाची पेस्ट, बेसन, कांदा, लाल तिखट, हळद, चाट मसाला व चवीपुरते मीठ टाकून एकजीव करून घ्या.
- दुसरीकडे गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात तांदळाच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून सोनेरी/लाल रंग येईपर्यंत तळून घ्या.
- आता गरमागरम तांदळाचे वडे नारळाच्या चटणीसह किंवा सॅाससह तुम्ही खाऊ शकता.