Panchamrut Recipe For Janmashtami : श्री कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी पूजा-विधीमध्ये पंचामृताच्या प्रसादाचा फार महत्व असते. विशेष म्हणजे कृष्णाला दही, दूध प्रिय असल्याने जन्माष्टमीला पंचामृत बनवले जाते. हिंदू धर्मातही पंचामृत कोणत्याही प्रकारच्या उपासनेसाठी शुभ मानले जाते. देवतांच्या मुर्तीलाही पंचामृताने अभिषेक केला जातो. तर प्रसाद म्हणूनही दिले जाते. पंचामृताला जिथे धार्मिक महत्त्व आहे तितके त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे. पंचामृताच्या सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. यामुळे यंदा श्री कृष्ण जन्माष्टमीला घरच्या घरी पंचामृत कसे बनवायचे जाणून घेऊ…
पंचामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) १ ग्लास दूध
२) १ ग्लास दही
३) १ टिस्पून तूप
४) ३ टिस्पून मध
५) साखर (चवीनुसार)
६) १० तुळशीची पानं
७) आवडीनुसार, ड्रायफ्रुट्स




पंचामृत बनवण्याची कृती
१) पंचामृत बनवण्यासाठी एका भांड्यात दही घालून चांगले फेटा.
२) यानंतर दूध, मध, साखर, तूप चांगले एकत्र करुन घ्या.
३) आता त्यात ८ ते १० तुळशीची पाने घाला.
४) तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता.
पंचामृताचे ‘हे’ आहेत आरोग्यादायी फायदे
पंचामृतात वापरले जाणारे दूध, दही हे दोन्ही पदार्थ मनाला शांती आणि शीतलता देतात. याशिवाय त्यातील साखर आणि मध गोडपणाबरोबरचं ताकद देते. तर तूप आणि तुळस तुमच्य शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करु शकतात.