पपई खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पपई आरोग्यासाठी फायदेशीर गुणांचा खजिना मानली जाते. यात अनेक पोषक तत्व आढळतात. पपईच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या जसे की, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, सूज इत्यादी समस्या दूर होतात. पचनक्रिया चांगली होण्यासाठी पपई खाल्ली जाते. जास्तीत जास्त लोक पिकलेली पपई खातात. पण आज आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाण्याचे फायदे सांगणार आहोत. तसेच कच्या पपईची सुकी भाजी कशी करायची याचीही रेसिपी आपण जाणून घेऊयात.

कच्या पपईची सुकी भाजी साहित्य

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

१ लहान पपई
१ टेबलस्पून जीरे, हिरवी मिरची ठेचा
३ टेबलस्पूून उडीद डाळ
१ टेबलस्पून जीरे ,मोहरी
१/२ टेबलस्पून हिंग
१ टेबलस्पून हळद
३ टेबलस्पूून तेल
३ टेबलस्पूून ओले खोबरे
कोथिंबीर,कडीपत्ता पाने
चवीनुसार मीठ
१/२ लिंबू रस

कच्या पपईची सुकी भाजी कृती

१. १ टेबलस्पून जीरे +हिरवी मिरची ठेचा, ३ टेबलस्पूून उडीद डाळ आणि पपई, ठेचा तयार करून घेऊ या.

२. ठेचा तयार करताना जीरे, हिरवी मिरची,आले, बारीक करून घ्या.

३. आता लोखंडी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कढीलिंब,हळद ठेचा घालून खमंग फोडणी करावी.उडीद डाळ घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

४. मग पपई घालून एकजीव करा.आता मीठ घालून झाकण ठेवून वाफ काढावी.चांगली वाफ आल्यावर त्यात खोबरे, लिंबू रस घालून एकजीव करा.

हेही वाचा >> इंस्टंट नूडल्स खाऊन मुलं होतात लठ्ठ? घरीच करा बटाट्याचे पौष्टिक नूडल्स; मुलंही आवडीनं खातील

५. शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व्ह करा.खुप सुंदर चविष्ट भाजी तयार आहे.

कच्च्या पपईचे आरोग्यदायी फायदे

पपईमध्ये पपेन नावाचं तत्व असतं जे पचनक्रिया सुधारतं आणि पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, ब्लोटिंग, सूज आणि बद्धकोष्ठताही दूर करतं.

कच्च्या पपईमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे कोलेजन उत्पादन वाढवतं. यामुळे त्वचा चांगली राहते. त्वचेवर सुरकुत्या आणि फाइन लाईन्स येत नाहीत.

कच्च्या पपईमध्ये सूज कमी करणारे तत्व असतात. जे शरीरातील सूज कमी करतात.

कच्च्या पपईमध्ये फायबर भरपूर असतं आणि कॅलरी कमी असतात. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरून राहतं. ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. अशात तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.

Story img Loader