आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचा खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे.तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. याच तोंडलीची जबरदस्त अशी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला पाहूयात मोठ्यांसोबत लहान मुलांना आवडेल अशी स्वादिष्ट “काजू तोंडली मसाला” भाजी कशी बनवायची.
काजू तोंडली भाजी साहित्य
१/४ किलो तोंडली धून उभी पातळ कापलेली
१ वाटी ओले काजू
मोठे कांदे बारीक चिरलेले
१/४ वाटी किसमिस
१/४ चमचा हळद दीड चमचा तिखट एक चमचा गोडा मसाला
चवीनुसार मीठ सुपारी एवढा गुळ
१/२ चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग
कढीपत्त्याची पाने
काजू तोंडली भाजी कृती
१. सर्वात आधी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिरं कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून त्यामध्ये हळद घालावी. कांदा घालून छान लालसर फ्राय करावा मग त्यामध्ये कापलेले तोंडली घालून फ्राय करावी
२. त्यानंतर त्यात तिखट, गरम मसाला, मीठ व गूळ घालून छान परतावे व वाफेवर भाजी शिजू द्यावी.
३. थोड्यावेळानं मध्ये मध्ये भाजी परतत राहावी व थोड्यावेळाने त्यामध्ये काजू व किसमिस घालून परत झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यावी.
हेही वाचा >> विदर्भ स्पेशल चमचमीत लसणीच्या फोडणीचे मेथीचे आळण; वाचा सोपी मराठी रेसिपी
४. शेवटी गॅस बंद करावा व भाजी छान परतून ती गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करावी. ही अतिशय सुंदर व टेस्टी अशी भाजी होते.