scorecardresearch

Premium

घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला, १ किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

Marathwada Kala Masala easy recipe: झणझणीत काळा मसाला रेसिपी नक्की ट्राय करा

kala masala recipe in marathi
काळा मसाला मराठी रेसिपी (फोटो: युट्युब/ @AnjalisRecipe Marathiवरून साभार)

kala masala recipe in marathi: काळा मसाला रेसिपी मराठी, काळा मसाला हा वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरून बनवलेला एक मसाला पावडर आहे. जी आपण जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी जेवणामध्ये वापरतो. काळ्या मसाल्या सोबत आपण अनेक प्रकारचे मसाला पावडर जेवणामध्ये वापरतो त्यामधील वारंवार वापरले जाणारे मसाले म्हणजे गोडा मसाला आणि गरम मसाला. काळा मसाला हा सर्वप्रथम खानदेशमध्ये बनवण्यात आला होता आणि हा मसाला त्या ठिकाणी कोणत्याही तिखट भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काळा मसाला हा मुख्यता आमटी मध्ये किंवा सांबर मध्ये घातला जातो आणि त्याची चव वाढवली जााते. चला तर पाहुयात त्याची सोपी रेसिपी..

काळा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

Kashmiri Lal Mirch Powder recipe
घरीच बनवा “काश्मिरी मिरची” पावडर; आता वर्षभर टेन्शन नाही, जाणून घ्या सोपी मराठी पद्धत
How to make ghati masala Kanda Lasoon Masala Satara kolhapur special ghati Masala
सातारा, कोल्हापूर स्पेशल “घाटी” मसाला आता घरीच बनवा; १ किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत
thyroid & mind
Health Special: थायरॉईड ग्रंथी आणि मनाचा संबंध
parineeti-chopra
लग्नामध्ये ‘या’ डिझायनरच्या लेहंग्यामुळे खुलणार परिणीती चोप्राचं सौंदर्य; कपड्यापासून दागिन्यांपर्यंतची माहिती समोर
  • १५ ग्राम चक्रीफूल
  • १० ग्राम जावित्री / जायपत्री
  • १५ ग्राम काळी मिरी
  • १५ ग्राम लवंग
  • १० ग्राम तमालपत्र
  • १५ ग्राम दालचिनी
  • १० ग्राम मसाला वेलची / काळी वेलची
  • ५ ग्राम सुंठ
  • १० ग्राम दगडफूल
  • १० ग्राम त्रिफळा
  • १० ग्राम शाह जिरं
  • १५ ग्राम पांढरे तीळ
  • १० ग्राम खसखस
  • ३ हळकुंड
  • १०० ग्राम सुकं किसलेलं खोबरं
  • २०० ग्राम धने
  • १०० ग्राम सुकी लाल मिरची (गुंटूर / लवंगी किंवा अन्य कोणतीही)
  • तेल

काळा मसाला कृती –

  • सर्वप्रथम सर्व मसाला स्वच्छ निवडून घ्या आणि सुखं खोबरं खिसून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. आता कढई गरम झाली कि त्यामध्ये सर्वप्रथम जे कोरडे मसाले भाजायचे आहे ते भाजून घ्या.
  • सर्वप्रथम कढईमध्ये तीळ भाजून घ्या मग त्यामध्ये मग खिसलेले सुखं खोबरं भाजून घ्या आणि मग जिरे भाजून घ्या आणि ते एक ताटामध्ये काढा
  • आता कढईमध्ये थोडे तेल घाला आणि त्यामध्ये धणे घालून त्याचा खमंग वास येईपर्यंत चांगले भाजून घ्या, आणि ते चांगले भाजले कि बाजूला काढा.
  • आता कढई मध्ये आणखीन थोडे तेल घाला आणि त्यामध्ये इतर खडे मसाला वेगवेगळे परतवून घ्या जसे कि दालचिन, हिंग, लवंग, काळी मिरी, बदाम फुल आणि दगड फुल घाला आणि ते वेगवेगळ तळून घ्या.
  • आता हे भाजलेले सर्व मसाले थोडे गार होऊ द्या.
  • ते मिश्रण गार झाले कि त्यामध्ये पहिल्यांदा सर्व खडे मसाले घ्या आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्या आणि मग ती पावडर भांड्यातून बाहेर काढा.
  • त्यानंतर त्यामध्ये धने घाला आणि ते देखील बारीक करून घ्या आणि ते देखील खड्या मसाल्यांच्यामध्ये काढा.
  • आता खोबरे देखील मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्या आणि तीळ-जिरे देखील बारीक करनू घ्या.
  • मग हे बारीक केलेले वाटण चांगले मिक्स करून घ्या आणि आणि हे सर्व वाटण थोडे थोडे करून परत मिक्सरला फिरवून घ्या ज्यामुळे सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स होतील.
  • अशाप्रकारे तुमचा काळा मसाला तयार झाला.

हेही वाचा >> आंबट आणि मसालेदार पेरू चटणी वाढवेल जेवणाची चव! ही घ्या सोपी मराठी रेसिपी

टीप : हा मसाला एक हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा, काळा मसाला हा हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा वास निघून जात नाही. काळी मिरी आणि लवंग घातल्यामुळे मसाल्याला तिखटपणा येतो. त्यामुळे हा मसाला आमटी किंवा सांबारमध्ये घालताना काळझीपूर्वक घाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kala masala recipe in marathi ingredients list in marathi marathwada kala masala easy recipe srk

First published on: 10-09-2023 at 13:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×