Khajoor Laddu : खजुरामध्ये पोषणमुल्ये अधिक प्रमाणात असल्याने आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यासाठी खजूर हे अधिक फायदेशीर आहे. जर तुमच्या मुलांना खजुर खाणे आवडत नसेल तर तुम्ही पौष्टिक खजुराचे लाडू बनवू शकता. फक्त ३० मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी ही सोपी डिश ट्राय करू शकता. त्यासाठी ही रेसिपी नोट करा.
साहित्य :
- खजूर
- खोबरे
- बदाम
- पिस्ता
- काजू
- तूप
- खसखस
हेही वाचा : Basundi Recipe : मलाईदार घट्ट बासुंदी कशी बनवावी? ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

Optical Illusion : कोंबडीच्या पिल्लांमध्ये लपलेत ५ लिंबू, गरुडासारखी नजर असेल तर शोधून दाखवा

Health Special: हृदयाच्या आरोग्यासाठी काय आहार असावा?

नातेसंबंध- डेटिंगला जाताना…

१ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा
कृती:
- खजुराच्या बिया काढा आणि मिक्सरमध्ये खजूर भरडसर बारीक करा.
- एका कढईत तूप गरम करा
- त्यात खसखस टाका आणि त्यात भरडसर बारीक केलेले बदाम, पिस्ता, काजू, लालसर भाजलेले खोबरे आणि खजूर मंद आचेवर परतून घ्या.
- नंतर एका ताटात हे सर्व मिश्रण काढा आणि हाताला तूप लावून लाडू बांधा.