khandeshi style kombdi besan recipe in marathi: मस्त गरमागरम वाफाळत पीठल त्यासोबत भाकरी, कांदा, लोणचं किंवा ठेचा असा फक्कड बेत आईनं पावसाळ्यात जमला तर अजून काय हवं…पिठलं हा प्रकार महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांपैकी एक आहे. महाराष्ट्रातल्या विविध राज्यांत वेगवेगळ्या चवीचं पिठलं तयार केल जात. घरात भाजी उपलब्ध नसेल तर, आपण पिठलं ही रेसिपी करू शकतो. चला तर मग आज खानदेशी पद्धतीचं कोंबडी बेसन रेसिपी

खान्देशी कोंबडी बेसन साहित्य

१ कप ५ तास भिजवलेली चणाडाळ
१ उभा चिरलेला कांदा
1 हिरवी मिरची बारीक चिरून/लाल तिखट
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून जीरे ,मोहरी,हिंग
कोथिंबीर
तेल

खान्देशी कोंबडी बेसन कृती

सर्वप्रथम चणाडाळ मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून ते भिजवून घ्यावे. ते चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे, त्यात पिठाची एकही गुठळी ठेवू नका.

पॅनमधे तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग, लसूण,मिरची,कांदा छान लालसर छान परतून घ्या.

नंतर त्यात हळद,मीठ वाटलेली डाळ घालून छान मिक्स करून घ्या. व ५ मि.वाफेवर छान शिजू द्यावे.

हेही वाचा >> रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मुग वड्याची रस्सा भाजी; झक्कास होईल बेत

शेवटी कोथिंबीर घालून छान मिक्स करून वरणभात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

आपले गरमागरम खमंग मेथी पिठलं भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.