scorecardresearch

आता वडापाव नाही, स्वादिष्ट पॅटीसवर ताव मारा, पॅटीसची सोपी आणि झटपट रेसिपी एकदा वाचाच

पॅटीस खायला तुम्हाला खूप आवडत असेल,तर एकदा पॅटीसच्या सोप्या रेसिपीबद्दही जाणून घ्या.

know about patties recipe
पॅटीसच्या रेसिपीबाबत जाणून घ्या. (Image-Freepik)

Patties Recipe : सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यावर सर्वांचीच नाश्ता करण्यासाठी लगबग सुरु होते. बाजारात गेल्यावर वडापावचा खमंग वास आला की, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण ज्यांना वडापाव खायला आवडत नाही, ते पॅटीसवर ताव मारतात. पण तुम्हाला माहितेय, पॅटीस बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. अगदी झटपट बनणारा पॅटीस नाश्त्यासाठी चविष्ट पदार्थ आहे. पॅटीस खायला ज्यांना आवडतं त्यांनी याची रेसिपीही जाणून घ्या. एक उत्तम रेसिपी केल्यानंतरच तुम्हाला स्वादिष्ट पॅटीस खायला मिळणार आहे.

अशी आहे पॅटीसची रेसिपी

साहित्य – बटाटे २५० ग्रॅम, कुस्करून घेतलेला हिरवा वाटाणा १ कप, हिरवा लसूण ५० ग्रॅम, आलं हिरव्या मिरचीचे वाटण, ४ मोठे चमचे, धणे-जिरे पूड १ मोठा चमचा, तेल तळण्यासाठी, मीठ स्वादानुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे, लिंबाचा रस १ मोठा चमचा, साखर १ मोठा चमचा, कॉर्नफ्लोअर २ ते ३ मोठे चमचे.

कृती – कढईच तेल तापवून त्यात आलं, हिरवी मिरची व लसणाचे वाटण परतून घ्या. त्यात कुस्करून घेतलेला वाटाणा घालू परता. नंतर त्यात धणे-जिरे पूड आणि कोथिंबीर घाला. मिश्रण शिजत आल्यावर त्यात खोबरं घालून मिश्रण एकजीव करा. शेवटी त्यात लिंबाचा रस आणि साखर घालून मिश्रण बाजूला ठेवा. थंड झाल्यावर मिश्रणाचे लहान लहान गोळे वळून घ्या. बटाटे उकडून घ्या. बटाटे सोलून कुस्करून घ्या. त्यात कॉर्नफ्लॉवर एकजीव करुन घ्या. पिठाची लहानशी पुरी एवढी लाटी हातावर घेऊन वाटाण्याच्या मिश्रणाचा गोळा त्यात भरुन गोलाकार वळून घ्या. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:08 IST
ताज्या बातम्या