Maggie Dosa Recipe : मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तुम्ही मॅगीचा कधी डोसा खाल्ला आहे का? हो, मॅगी डोसा. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मॅगी डोसा कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सोशल मीडियावर दर दिवशी अनेक नवनवीन रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपीचे व्हिडीओ अचंबित करणारे असतात. हा मॅगी डोसाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही अगदी सोपी रेसिपी आहे. जाणून घेऊ या मॅगी डोसा कसा बनवायचा? (Maggie Dosa Recipe do you ever eat Maggie dosa to know recipe of Maggie dosa watch viral video)
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
साहित्य
- मॅगी
- तांदळाचे पीठ
- रवा
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेला टोमॅटो
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- चिली फ्लेक्स
- कोथिंबीर
- मॅगी मसाला
- आल्याची पेस्ट
- पाणी
- तेल किंवा तूप
हेही वाचा : Modak Recipe : फक्त १५ ते २० मिनिटांत बाप्पासाठी करा मोदक; तोंडात टाकताच विरघळतील; रेसिपी पटकन लिहून घ्या
पाहा व्हायरल व्हिडीओ
कृती
- सुरुवातीला मॅगी चे बारीक तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
- त्यानंतर मॅगीचे पावडर तयार होईल.
- या मॅगीच्या पावडरमध्ये तांदळाचे पीठ टाका आणि रवा टाका.
- त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
- बारीक चिरलेला टोमॅटो टाका
- त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका
- आल्याची पेस्ट व चिली फ्लेक्स टाका.
- चवीनुसार मॅगी मसाला टाका
- बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
- आणि शेवटी पाणी टाका
- हे मिश्रण एकजीव करा आणि पातळ मिश्रण तयार करा.
- गॅसवर एक तवा ठेवा.
- तव्याला तेल किंवा तूप लावा आणि त्यावर हे मिश्रण टाका.
- दोन मिनिटे हा मॅगी डोसा शिजवून घ्या.
- तुमचा मॅगी डोसा तयार होईल.
हेही वाचा : नावडती तोंडली होईल सर्वांची आवडती; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “काजू तोंडली मसाला” भाजी
homecheff_renu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मॅगी डोसा” या व्हिडीओच्या अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आगळी वेगळी रेसिपी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान मी नक्की हा पदार्थ बनवणार.”
यापूर्वी सुद्धा अशा अनेक अनोख्या रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. काही रेसिपी नेटकऱ्यांना आवडतात तर काही रेसिपींवर नेटकरी टीका करतात. काही महिन्यांपूर्वी बार्बी गुलाबी रंगाची बिर्याणी रेसिपीची चांगलीच चर्चा रंगली होती.