Shevpuri Sandwich Recipe: व्हेजिटेबल सँडविच, टोस्ट सँडविच, चिकन सँडविच आतापर्यंत तुम्ही अनेकदा ट्राय केले असेल. पण आज आम्ही तुम्हाला शेवपुरी सँडविच कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग पटकन नोट करा साहित्य आणि कृती…

शेवपुरी सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४ उकलेले बटाटे
  • २ टोमॅटो बारीक केलेले
  • १ चमचा चाट मसाला
  • २ कांदे बारीक चिरलेले
  • १० ब्रेड स्लाइस
  • १ वाटी पूदिना चटणी
  • १ वाटी आंबटगोड चटणी
  • २ चमचे बटर
  • कोथिंबीर
  • १ कप शेव
  • १२-१३ चपटी पुरी
  • चवीनुसार मीठ

शेवपुरी सँडविच बनवण्याची कृती:

हेही वाचा: शिळ्या पोळीपासून झटपट बनवा मसाला पोळी; नोट करा साहित्य आणि कृती

Potato bread Recipe
‘पोटॅटो ब्रेड रोल’ची जबरदस्त सोपी मराठी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Dabeli recipe at home easy way of making dabeli trending now
घरच्या घरी झटपट करा चविष्ट ‘दाबेली’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Tanned even after applying suscreen here is a Dermatologist suggestions
सनस्क्रीन लावूनही त्वचा होतेय काळपट? यामागचं नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी केला खुलासा
leftover roti ladoo marathi recipe
leftover roti ladoo : गोड खाण्याची इच्छा होते? मग घरीच, झटपट बनवा पोळीचे लाडू; लिहून घ्या रेसिपी
loksatta balmaifal Ganapati festival holiday school
सुखाचे हॅशटॅग : तुच तुझा सुखकर्ता
The Ultimate Whole Lentil Biryani Recipe
एकदा अख्खा मसूर बिर्याणी खाऊन पाहा, चिकन किंवा मटण बिर्याणी विसरून जाल! झटपट लिहून घ्या सोपी रेसिपी
Why do we dream do you know the reason behind it know the reason
Dream: माणसाला झोपेत स्वप्न का पडतात माहितीये का? जाणून घ्या
  • सर्वात आधी बटाटे उकडून बारीक करून घ्या त्यात कोथिंबीर, मीठ, चाट मसाला घालून सर्व एकत्र करून घ्या.
  • ब्रेडवर आधी बटर नंतर पुदीना चटणी लावून घ्या. आता त्यावर चपटी पुरी ठेऊन त्यावर बटाट्याचे मिश्रण घाला.
  • त्यानंतर त्यावर कांदा, टोमॅटो, पुदीना चटणी, आंबटगोड चटणी, शेव घालून बटर लावलेले ब्रेड स्लाइस ठेवा.
  • टोस्ट सँडविचचे भांडे घेऊन सँडविच दोन्ही बाजूंनी व्यवस्थितीत भाजून घ्या.
  • तयार गरमागरम टोस्ट सँडविच सॉससह सर्व्ह करा.