scorecardresearch

चिमुकल्या शेफने दाखवली स्प्रिंग रोलची रेसिपी; रेसिपी घ्या आणि ‘हा’ पदार्थ वापरून पाच मिनिटांत बनवून पाहा….

पाच मिनिटांत आणि अतिशय सोप्या पद्धतीने पापड वापरून तुम्ही घरी स्प्रिंग रोल्स बनवू शकता. बनवायला अतिशय सोपी असणारी स्प्रिंग रोलची रेसिपी काय आहे ते पाहा.

use papad to make spring rolls
पापड वापरुन पाच मिनिटात घरी बनवा स्प्रिंग रोल्स. [photo credit – freepik]

दुपारचा चहा आणि रात्रीचे जेवण यांच्यामधली जी वेळ असते, त्यात काहीतरी मस्त आणि वेगळं असं खावंसं वाटत. कधी चाट तर कधी वडापाव, भजी किंवा काहीच नाही तरी नूडल्ससारखे चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा वेळी घरी उपलब्ध असणाऱ्या गोष्टीचा वापर करून जर तुम्हाला बाहेर मिळतात तसे स्प्रिंग रोल्स पाच मिनिटांत बनवता आले तर? या प्रश्नांसोबत त्याचं उत्तरदेखील इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @mymom_taughtmethis या अकाऊंटने या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या स्प्रिंग रोल्सची रेसिपी शेअर करून दिले आहे.

विशेष म्हणजे ही रेसिपी एका चिमुकल्याने बनवली आहे. त्याने स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी पापडाचा वापर केला आहे. आता ही पाच मिनिटांत तयार होणाऱ्या स्प्रिंग रोलची रेसिपी काय आहे ते पाहू.

jugaad video
याला म्हणतात जुगाड! तरुणाने बनवली चक्क पाण्यावर चालणारी सायकल, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
easy trick to clean dirty switch board How to Clean Switch Board At Home Easy Way
अवघ्या ५ मिनिटांत काळा पडलेला स्विच बोर्ड होईल स्वच्छ, वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स
food products expiry date
Health Special: खाण्याच्या पदार्थांची एक्स्पायरी डेट तुम्ही चेक करता का?
Never Ever Grind These Five Food Items In Mixer it will cost Money and Mixie Blades Will Make Noise And Loose Sharpness
Kitchen Jugaad: ‘हे’ ५ पदार्थ मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका; भांड्यातील पाती बिघडून खडखडा वाजू लागतील

पापड स्प्रिंग रोल्स रेसिपी

साहित्य

उडदाचे पापड
सिमला मिरची
कोबी
शेजवान चटणी
तेल

कृती

सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्या. आता त्यामध्ये बारीक आणि उभी चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी आणि शेजवान चटणी मिसळून सर्व गोष्टी छान परतून घ्या. ही भाजी पूर्णपणे न शिजवता, आवडत असल्यास थोडी कुरकुरीत ठेवली तरीही चालेल.

आता एका बाउलमध्ये पाणी घ्या. या पाण्यात उडदाचा एक पापड भिजवून व्यवस्थित ओला करून घ्या. आता या ओल्या केलेल्या उडदाच्या पापडामध्ये तयार केलेली भाजी घालून पापडाची गुंडाळी करून, पापड सगळीकडून घट्ट बंद करून घ्या.

हेही वाचा : या पाच सोप्या हॅक्स ठेवतील इडली पात्र चकचकीत; पाहा भांड्यांना मिनिटांत स्वच्छ करतील या टिप्स…

मगाशी वापरलेल्या तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्या. तेल तापल्यानंतर पापडाच्या तयार रोल्सची बंद केलेली बाजू तव्यावर ठेवून सोनेरी होईपर्यंत परता. तसेच दुसऱ्या भागासोबतही करा. दोन्ही बाजूंनी पापड छान सोनेरी झाल्यानंतर एका ताटलीत काढून घ्या. तयार आहेत आपले झटपट बनणारे पापड स्प्रिंग रोल्स. हे पापड स्प्रिंग रोल्स टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खायला मस्त लागतील.

या पापडांमध्ये तुम्ही रंगीत सिमला मिरची किंवा घरात तयार असलेली भाजी घालूनदेखील बनवू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make delicious papad spring rolls only in 5 minutes at home simple and easy snack recipe dha

First published on: 20-11-2023 at 14:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×