बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सकाळच्या वेळी मनसोक्त असा नाश्ता खायला मिळत नाही. कारण आवडीचा नाश्ता बनवायचा म्हटलं तर त्यासाठी वेळ जाणार आणि नेमका तोच सध्या लोकांजवळ नाहीये. कारण आजकाल बहुतेक लोक बिझी असतात, त्यामुळे कामाला जायच्या गडबडीत काहीतरी सोपे आणि पटकन होतील असे मॅगी सारखे फास्ट फूड बनवतात आणि खातात.

मात्र, असा अनहेल्दी नाश्ता बनवणं आणि खाणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये झटपट बनवता येऊ शकते अशी हेल्दी आणि चविष्ट ओट्स आप्पे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर ओट्स आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

हेही वाचा- हॉटेल स्टाईल दाल खिचडी तडका घरीच बनवूया; ढाब्यावरची परफेक्ट चव कशी द्यायची, चला बघूया

साहित्य –

ओट्स बारीक केलेले १ वाटी, चणाडाळ पाव वाटी (४ ते ६ तास भिजवलेली), मूगडाळ पाव वाटी (४ ते ६ तास भिजवलेली). ब्राऊन तांदूळ पाव वाटी (४ ते ६ तास भिजवलेला), ताक अर्धी वाटी, आले-मिरची-कोथिंबीर पेस्ट १ चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ आणि तेल आवश्यकतेनुसार, साखर १ चमचा.

हेही वाचा- खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती-

प्रथम भिजवलेली चणा, मूगडाळ आणि ब्राऊन तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्या व ४ तास पीठ आंबवण्यास ठेवा. आप्पे करायच्या १ तास आधी ओट्स व ताक वरील बॅटरमध्ये एकत्र करा. आप्पे तयार करायच्या वेळी आलं-मिरची पेस्ट, जिरेपूड, मीठ, साखर घालून मिक्स करा. आप्पे पात्र गॅसवर ठेवून थोडे तेल घालून वरील बॅटर त्यामध्ये ओता व ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा. हे आप्पे कुठल्याही चटणीसोबत खायला चांगले लागतात.