Makhana Barfi Recipes: नुकताच श्रावण सुरु झाला असून श्रावणात अनेकजण श्रावणी सोमवारी, शुक्रवारी किंवा शनिवारी उपवास करतात. या दिवशी बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी खातात. पण आज आम्ही तुम्हाला आरोग्यासाठी पौष्टिक असलेली मखान्याची बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती… मखान्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (Makhana Barfi Recipes) २०० ग्रॅम मखाने २ वाटी नारळ पावडर २ वाटी शेंगदाणे २ पाकिट दूध पावडर १/२ वाटी तूप ४०० ग्रॅम दूध १ वाटी साखर ७-८ वेलची मखान्याची बर्फी बनवण्यासाची कृती: हेही वाचा: संध्याकाळी भूक लागते, काहीतरी चटपटीत खावसं वाटतं? मग बनवा ‘बटाटा पोहा रोल’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती सर्वात आधी बर्फी बनवण्यासाठी नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप घालून मखाने भाजून घ्या. मखाने भाजून झाल्यानंतर एका ताटात सर्व काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून साधारण ५-१० मिनिट भाजून घ्या. आता हे मखाने आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करुन घ्या. दुसरीकडे एका भांड्यात दूध गरम करा आणि त्यात साखर टाकून घ्या. दूधाला उकळी आल्यावर त्यामध्ये मखान्याचे मिश्रण आणि मिल्क पावडर देखील मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण एकसारखे ढवळून घ्या. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून काही वेळ सेट करण्यासाठी ठेवा. हे मिश्रण काही सेट झाल्यानंतर बर्फीप्रमाणे त्याचे बारीक काप करा. तयार पौष्टिक मखाना बर्फीचा आस्वाद घ्या.