Mango Mastani Recipe In Marathi : आंबे खाल्ल्याशिवाय उन्हाळा पूर्णच होत नाही. चेहऱ्यावर कितीही पिंपल्स येउदेत आमरस पुरी, मँगो शेक, मँगो आइस्क्रीम आणि अगदीच काही नाही तर नुसता आंबा कापून खाणे सुद्धा या दिवसांमध्ये स्वर्गसुख मानले जाते. तर आज आपण आंब्यापासून एक अनोखा आणि सध्या ट्रेंडमध्ये असणारा पदार्थ बनवायचा कसा ते बघणार आहोत आहोत तो म्हणजे ‘मँगो मस्तानी’…
साहित्य
- आंबे – २
- दूध – २ कप
- साखर – १ मोठा चमचा
- व्हॅनिला आईस्क्रीम
- बारीक चिरलेला सुका मेवा आणि पिस्ते
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- एका बाउलमध्ये पाणी ठेवून त्यात आंबे स्वच्छ धुवून घ्या.
- नंतर आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यात एक कप दूध, व्हॅनिला आईस्क्रीम, साखर घाला आणि मिक्स करून घ्या.
- मग एका ग्लासमध्ये आंब्याचे छोटे तुकडे, त्यात मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलेलं मिश्रण आणि व्हॅनिला आईस्क्रीम, पिस्ता, टुटी फ्रुटी
- त्यानंतर पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण व्हॅनिला आईस्क्रीम, पिस्ता आणि सजावटीसाठी आंब्याचे तुकडे वरून घाला.
- अशाप्रकारे मँगो मस्तानी तयार.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा ही रेसिपी व्हिडीओद्वारे @foodiesfood_court या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
