Mango Sheera Recipe : लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत आंबा खायला अनेकांना आवडतो. असाच आंबा कापून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करून मँगो मस्तानी, मिल्कशेक, आईस्क्रीम, कुल्फी, आमरस आपण नेहमीच बनवून बघतो. पण, आज आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

साहित्य

  • १ कप रवा
  • 1/2 कप तूप
  • 3/4 ते 1 कप साखर
  • १ कप आंब्याचा गर
  • १ कप दूध
  • 1.5 कप गरम पाणी

फ्लेव्हर & गार्निश

  • १/२ चमचे वेलची पूड
  • १० ते १२ काजू
  • ८ ते १० बदाम
  • केशर (पर्यायी)

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • पातेल्यात तूप आणि रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात काजू, बदाम, पिस्ता, मनुके घालून त्यात पाणी घाला.
  • त्यानंतर दूध, केसर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • मग त्यात साखर आणि आंब्याचा रस, वेलची पूड घालून मिक्स करा.
  • अशाप्रकारे तुमचा आंब्याचा शिरा तयार.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी रेसिपी व्हिडीओद्वारे @me_haay_foodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.