Vegetarian Recipes: थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवण्यासाठी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो जे गरम असतात. यामुळे शरीरात एक उबदारपणा राहतो. अशावेळी अनेकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी बनवली जाते. विशेषत: हिवाळ्यात बाजरी, तांदूळ, मूगडाळ, मिक्सव्हेज आणि वेगवेगळे पदार्थ वापरून स्पेशल खिचडी बनवली जाते. पण आज आपण हिवाळ्यासाठी स्पेशल उडीद डाळची खिचडी करण्याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

यातही इतर खिचडीप्रमाणे चवदार मसाले आणि नॉर्मल सिजनल भाज्यांचा वापर केला जातो. चला तर पाहू उडीद डाळची खिचडीची रेसिपी

water tank cooling tips
Jugaad Video: उन्हाळ्यात नळातून पाणी गरम येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप

साहित्य

२ कप तांदूळ
२ कप उडिद डाळ
१ कप मटर
१ कप फूल कोबी
२ छोटे बटाटे कापलेले
४ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
१ छोटा चमचा हळदी पावडर
चिमुटभर हींग
२ छोटे चमचे जीरे
स्वादानुसार मीठ
दोन ते तीन चमचे तूप
१ छोटा चमचा गरम मसाला

कृती

उडीद डाळीची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम नवीन तांदूळ आणि भिजवलेली उडीद डाळ धुवून बाजूला ठेवा. आता गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवत त्यामध्ये एक चमचा तूप टाका आणि चांगला गरम करा. मग त्यात जीरे, हिरवी मिर्ची, हींग टाकून चांगली फोडणी द्या आणि परता. त्यानंतर मटर, बटाटा, टोमॅटो आणि कोबी टाका आणि हे मिश्रणही पाच मिनिट परतत राहा.

आता त्यात हळद तसेच गरम मसाला टाकून परता. भाजी शिजली की त्यात उडीद डाळ आणि तांदूळ टाकून परता. आता ३ ते ४ कप पाणी टाकून झाकण लावा आणि कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या होऊ द्या. मग खिचडी शिजल्या नंतर चमचाने चांगली मिक्स करा आणि एका बाऊलमध्ये काढा. त्यावर हिरवी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.