Mediterranean Fish Fillet Recipe In Marathi: आपल्याकडे पाहुणे आल्यावर किंवा खास निमित्ताने स्पेशल पदार्थ बनवले जातात. पाहुणे घरी आल्यावर त्यांचा योग्य पाहुणचार करण्यासाठी त्यांना चमचमीत पदार्थ खाऊ घालायचा विचार प्रत्येक गृहिणीच्या मनात येत असतो. पण अनेकहा पाहुण्याचा तेच ते चिकन, मटणचे पदार्थ तयार केले जातात. तेव्हा घरातली लोक खूप वैतागतात. अशा वेळी काहीतरी स्पेशल चविष्ट पदार्थ बनवायचा विचार येत असल्यास तुम्ही Mediterranean Fish Fillet ही रेसिपी बनवू शकता. पाहुण्याव्यतिरिक्त घरातल्या सदस्यांसाठीही तुम्ही हे हॉटेल स्टाइल माशांचे काप बनवू शकता. चला तर मग Mediterranean Fish Fillet (माशांचे काप) कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.
साहित्य:
कापांकरिता –
- पापलेट/रावस ३ मध्यम आकाराचे तुकडे
- चवीसाठी ऑरिगॅनो अर्धा चमचा
- मीठ स्वादानुसार
- ताजे कुटलेले मिरे
सॉस करिता-
- ऑलिव्ह ऑइल दीड चमचा
- कांदा अर्धा मध्यम (बारीक चिरलेला)
- टोमॅटोचे काप १ कप (बारीक काप)
- ऑलिव्हचे काप पाव कप
- व्हाइट वाइन (पर्यायी) दोन मोठे चमचे
- चवीसाठी १ लसूण पाकळी
- मीठ
- कुटलेल्या मिऱ्या
- ऑरिगॅनो
- ऑरेन्ज झेस्ट (संत्र्याच्या सालीचा किस) पाव चमचा
कृती:
- सॉससाठी ओव्हन ४५० फेरेन्हाइट / २२० डिग्री से. वर गरम करून ठेवा.
- एका तव्यामध्ये (कड असलेला) ऑलिव्ह ऑइल तापवा.
- त्यात कांदा परतून घ्या. त्यात टोमॅटो, ऑलिव्ह घालून एकत्रित करा.
- त्यात ऑरिगॅनो, ऑरेन्ज, मीठ आणि कुटलेल्या मिऱ्या घालून मिसळा.
फिलेसाठी –
- माशांच्या तुकड्यांवर मीठ आणि कुटलेल्या मिऱ्या चोळून घ्या.
- हे तुकडे ओव्हनच्या पात्रात ठेवा (एक थरात).
- माशांच्या कापांवर सॉसचे आवरण होईल इतका सॉस घाला.
- ओव्हनचे पात्र न झाकता १०-१२ मिनिटे ओव्हनमध्ये शिजवून घ्या.
- हे माशांचे काप वाढताना उरलेला सॉस वरून ओता.
आणखी वाचा – पापलेट फिश करी बनवून करा खास Non-Veg बेत; पटकन नोट करा सोपी रेसिपी