पावसाळ्यात काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा, कॉफी प्यायला आवडत असेल तरी सारखं सारखं चहा-कॉफी पिणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर सूप हा उत्तम पर्याय आहे. पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा सूप बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.

हॉट वेज सूप बनवण्यासाठी साहित्य

कांदा – २ बारीक चिरून
हिरवी मिरची – ३ बारीक चिरून
लसूण – ४-५ लवंगा
सेलेरी – २
ब्रोकोली- १ (भाज्या आवडीनुसार)
गाजर – २
ओवा – १ चमचा
बडीशेप – २ टिस्पून
ऑलिव्ह तेल – २ टिस्पून
पाणी – ४ ग्लास

हॉट वेज सूप कसं बनवायचं?

१. सूप बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल गरम करा.

२. यानंतर त्यात लसूण घालून २ मिनिटे परतून घ्या.

३. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.

४. आता त्यात सर्व चिरलेल्या भाज्या आणि पाणी घाला.

५. नंतर ते सुमारे ३० मिनिटे चांगले उकळवा.

६. यानंतर मीठ आणि हलकी काळी मिरी घालून मिक्स करा.

७. तुमचा चविष्ट आणि आरोग्यदायी गरम व्हेज सूप तयार आहे.

हेही वाचा >> सुख म्हणजे आणखी काय असतं..! पावसात चहासोबत ‘ही’ वेगळ्या पद्धतीची कांदा भजी खाल्ली? पाहा झटपट रेसिपी

८. सर्व्हिंग बाऊलमध्ये गाळून गरमागरम सर्व्ह करा.