रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट मुग वड्याची रस्सा भाजी बनवू शकता. रस्सा भाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट मुग वड्याची रस्सा भाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार मुग वड्याची रस्सा भाजी रेसिपी कशी बनवायची.

मुग वड्याची रस्सा भाजी साहित्य

१ कांदा एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला
एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला
१ टेबलस्पून आलं-लसूण सुकं खोबरं याच वाटण
१५ कडीपत्त्याची पाने
१ चमचा गोडा मसाला
१/४ चमचा हळद
१ चमचा कांदा लसूण मसाला
१/२ चमचा तिखट
चवीनुसार मीठ
२ वाटी मुग वडी
दीड टेबलस्पून तेल
१/२ चमचा जीरे
अर्धा चमचा मोहरी
चिमूटभर हिंग
सुपारीएवढा गुळाचा खडा
थोडीशी कोथिंबीर

मुग वड्याची रस्सा भाजी कृती

१ . प्रथम भाजीच्या कुकरमध्ये थोडं तेल टाकून मुगवडी हलकेच सोनेरी रंगावर भाजून घ्यावी व बाजूला काढून ठेवावी

२. मग त्याच कुकरमध्ये बाकी उरलेलं तेल घालून हिंग मोहरी कढीपत्त्याची खमंग फोडणी करून त्यात कांदा,टोमॅटो हळद,तिखट घालून छान परता.

३. तेल सुटु लागलं की त्यामध्ये खोबऱ्याचे वाटण, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला,मीठ,गूळ, थोडीशी कोथिंबीर घालून छान परतावं.

४. भाजलेले मूग वडे त्यामध्ये घालावे व बुडेल इतपत गरम पाणी घालून कुकर चे झाकण लावावं व दोन ते तीन शिट्ट्या कराव्या.

हेही वाचा >> नावडती तोंडली होईल सर्वांची आवडती; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “काजू तोंडली मसाला” भाजी

५. थंड झालं की भाजी काढून त्यामध्ये कोथिंबीर भुरभुरावी व भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत खावी अतिशय टेस्टी व सुंदर अशी भाजी होते.