सकाळी उठल्यावर पोट साफ होते आणि आंघोळ वगैरे आवरुन झाले की आपल्याला दणकून भूक लागते. रात्रभर पोट रिकामे असल्याने पोटात जणू खड्डाच पडलेला असतो. एकीकडे ऑफीसला जायची घाई, स्वयंपाकाची घाई आणि त्यात घरातील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा. कितीही घाई असली तरी ब्रेकफास्ट मात्र करायलाच हवा. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, हेल्थी ब्रेकफास्ट रेसिपी, चला तर मग बघुयात कसा बनवायचा हेल्थी ब्रेकफास्ट

हेल्दी ब्रेकफास्ट साहित्य –

  • अडीच कप ओट्स, अर्धा कप जाडसर बदाम काप
  • ११३ ग्रॅम मध, ३ मोठे चमचे लो कॅलरी बटर
  • पाव कप गूळ, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
  • पाव चमचा मीठ, अर्धा कप काळ्या मनुकांचे काप
  • १ मोठा चमचा भाजलेली अळशी

हेल्दी ब्रेकफास्ट कृती –

सर्वप्रथम ओव्हन ३५० डी. फॅ. वर तापवा. ओव्हनमधील बेकिंग ट्रेवर अॅल्युमिनियम फॉइल बसवा. ब्रशने अथवा बोटांनी फॉइलवर आणि ट्रेच्या कडांवर तेलाचा हात फिरवा. आता त्या ट्रेवर बदाम आणि ओटस् पसरावा आणि ५ मिनिटे किंचित भाजून घ्या. त्याला एका बाऊलमध्ये काढून घ्या. मध्यम आचेवर बटर, मध, गूळ, व्हॅनिला इसेन्स आणि मीठ पॅनमध्ये एकत्र करून तापवा. बटर आणि गूळ विरघळून एकत्र होईपर्यंत अधूनमधून मिश्रण हलवत राहा. हे मिश्रण भाजलेल्या ओटस् आणि बदामावर घालून चांगलं एकजीव करा. थंड झाल्यावर त्यात अळशी आणि काळ्या मनुका मिसळा. आयताकृती पॅनमध्ये हे मिश्रण ओतून रबरी कालथ्याने अथवा बोटे थोडीशी ओली करून ते दाबा आणि दोन तास फ्रिजमध्ये थंड करत ठेवा.

viral video man making coffee on cycle
अशी भन्नाट ‘सायकल कॉफी’ आजपर्यंत कुणी पाहिली नसेल! Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…
a bride made Mehndi QR Code on the hand to get wedding gift video goes viral shared by Google
लग्नाचा आहेर घेण्यासाठी नवरीचा जुगाड! मेहंदीने हातावर कोरला QR Code, गुगलने शेअर केला व्हिडीओ
wagonr converted to pickup van see desi jugaa viral video
पठ्ठ्याच्या क्रिएटिव्हिटीला तोड नाही! जुगाडद्वारे बनविला वॅगनआर कारचा टेम्पो; VIDEO पाहून युजर्स अवाक्
Women Packed Large bicycles with Fast Packing Skill after see viral video you will shock
व्वा! पिशवीत भरली हवा अन्… महिलेचं सुपर फास्ट पॅकिंग कौशल्य पाहून व्हाल थक्क; VIDEO पाहून म्हणाल, स्मार्ट वर्क…

हेही वाचा – Jamun Icecream Recipe: नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली जांभूळ आइस्क्रीम, उन्हाळ्यात नक्की ट्राय करा

दोन तासांनंतर हे कणीदार मिश्रण पॅनमधून एका ॲल्युनिमियम फॉइलवर काढा आणि त्याचे बारा समान तुकडे करा. हा ग्रॅनोला बार बंद डब्यात भरा. ते बाहेर अथवा फ्रिजमध्ये ठेवू शकता.