Mother’s Day Special Badam Burfi Recipe : आईवर प्रेम दाखवण्यासाठी काही खास दिवस नसला तरी प्रत्येक दिवस आईचा असतो. पण मदर्स डे ही प्रत्येक मुलासाठी नक्कीच एक संधी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आईला स्पेशल फील देऊ शकता. तुमच्या आयुष्यातील खास महिलांचा हा दिवस आणखी खास असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना खास रेसिपी बनवून देऊ शकता. नॅचरल स्वीटनर वापरून घरच्या घरी मिठाई सहज बनवता येते. येथे आम्ही २ शुगर फ्री मिठाईच्या रेसिपी सांगत आहोत, ज्या तुम्ही देखील सहज ट्राय करू शकता.

शुगर फ्री फिरनी रेसिपी

21st July Panchang & Rashi Bhavishya
२१ जुलै पंचांग: गुरुपौर्णिमेला साईबाबा कोणत्या राशीला देतील आशीर्वाद? शुभ दिनी १२ राशींपैकी कुणाचं नशीब उजळणार?
15th July Rashi Bhavishya & Panchang
१५ जुलै पंचांग: देवशयनी एकादशीआधीचा शेवटचा सोमवार १२ पैकी ‘या’ राशींना देणार लाभ, वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य
August Lucky Zodiac
August Lucky Zodiac : ऑगस्ट महिन्यात ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार! मंगळ गोचरमुळे मिळेल छप्परफाड पैसा
Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ramdev Baba Dance
अनंत अंबानीचा हात धरून रामदेव बाबांनी केला भन्नाट डान्स; राधिका- अनंतच्या शाही लग्नसोहळ्यातील नवा Video आला समोर
9th July Panchang & Rashi Bhavishya
९ जुलै पंचांग: आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी अन् सिद्धी योग जागृत; आज १२ पैकी ‘या’ राशींचा दिवस जाईल मोदकापेक्षा गोड
6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya
६ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या सुरुवातीला शनीचं वरदान; आज अचानक धनलाभासह १२ राशींना काय फायदा होईल पाहा
Hardik Pandya PM Modi Video viral
‘गेले ६ महिने माझ्यासाठी खूप…’, हार्दिक पंड्या पंतप्रधान मोदींशी बोलताना झाला भावुक, पाहा VIDEO
weekly horoscope 1 july to 7 july
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी! वृषभ-कर्क राशीच्या लोकांना मिळेल अपार पैसा अन् यश

फिरनी ही एक साधी तांदळाची खीर आहे, जी दूध हळूहळू उकळून बनते. जाणून घ्या बनवण्याची रेसिपी

साहित्य

१. तांदूळ
२. छोटी वेलची
३. आर्टिफिशियल स्वीटनर
४. पिस्ता
५. बदाम
६. गुलाब इसेंस

कृती

हे बनवण्यासाठी तांदूळ गाळून घ्या आणि ब्लेंडरमध्ये थोडे दूध घालून चांगले ब्लेंड करा. आता एका पातेल्यात दूध उकळा. आता त्यात बारीक केलेले तांदूळ घाला आणि नीट उकळवा. मंद आचेवर शिजवताना अधून मधून ढवळत राहा. सुमारे २०-२५ मिनिटे शिजवा. शेवटी वेलची पावडर आणि स्वीटनर घाला. आता फिरनीमध्ये पिस्ता आणि गुलाबाचा इसेंस घाला. फिरनी तयार आहे.

हेही वाचा >> Biscuit Recipe:फक्त १० रुपयांचे बिस्किट वापरुन बनवा अफलातून मिठाई; झटपट करा जेवणात खास स्वीट डिश

शुगर फ्री बदाम बर्फी रेसिपी

बदाम बर्फी ही शुगर फ्री आणि हेल्दी मिठाई आहे. त्यात अक्रोड, अंजीर आणि बदाम यांसारखे नट्स टाकले जातात. ते कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या

साहित्य

१. मावा
२. बदाम
३. सुका मेवा (अक्रोड, पिस्ता आणि अंजीर)
४. वेलची पावडर
५. जायफळ पावडर

बदाम बर्फी कशी बनवायची

एका पॅन किंवा कढईमध्ये मावा आणि बारीक केलेले बदाम मिक्स करा. हे नीट मिक्स करा आणि अधूनमधून ढवळत असताना मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजवा. आता मिक्स केलेले काजू, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घाला. त्यांना चांगले मिक्स करा. आता एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण प्लेटवर चांगले पसरवा. थंड होण्यासाठी किमान ४ ते ५ तास असेच राहू द्या. नंतर व्यवस्थित सेट झाल्यावर त्याचे समान तुकडे करा. तुमची बदाम बर्फी तयार आहे