Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi: रविवार आणि नॉन व्हेज हे समीकरण आपल्याला अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. बऱ्याच जणांकडे रविवारी सकाळी नॉन व्हेज घ्यायला जाणे हा घरातील एका व्यक्तीचे ठरलेले काम असते. ती व्यक्ती न कंटाळता नॉन व्हेजच्या प्रेमापायी ते काम पूर्ण करत असते. रविवारी सगळे घरी असतात. अशा वेळी जेवणाच्या निमित्ताने एकत्र बसणं, बोलणं, गप्पा मारणं होत असतं. तर तुम्हीही या रविवारी मटण खिमा मटार पाव ही हटके रेसिपी नक्की ट्राय करा.चला तर ही रेसिपी बनवायची सोपी रेसिपी पाहूयात. मटण खिमा मटार पाव साहित्य ५०० ग्रॅम मटण खिमा६० ग्रॅम ताजे मटार२ टेबलस्पुन आले लसुणाची जाडसर पेस्ट२-३ बारीक चिरलेले कांदे२ हिरव मिरच्या उभ्या चिरलेल्या१/2 टिस्पुन हळद१/2 टेबलस्पुन आग्री मसाला२-३ टेबलस्पुन भाजलेला कांदा खोबरआलं लसुण जिऱ्या ची पेस्ट(वाटण)२ टेबलस्पुन बारीक चिरलेली कोथिंबिर१ टिस्पुन गरम मसालाचविनुसार मीठ२-३ टेबलस्पुन तेल२-३ टिस्पुन बटर४ लादी पाव मटण खिमा मटार पाव कृती १. सर्वप्रथम मटण खिमा स्वच्छ धुवुन ठेवा. नंतर मटार धुवुन ठेवा. कुकरमध्ये तेल बटर गरम करून त्यात जीरे व आलेलसुण पेस्ट परता त्यातच कोथिंबीर व चिरलेला कांदा मिक्स करून चांगला लालसर होई पर्यंत परता. हळद मिक्स करून परता नंतर त्यात तयार वाटण व आग्री मसाला मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतत रहा. २. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर वरील वाटणात खिमा मिक्स करून परतुन घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी मिक्स करा व चविनुसार मीठ टाकून झाकण ठेवुन स्लो फ्लेम वर १०-१५ मिनिटे शिजवा. ३. नंतर त्यात मटार मिक्स करून शिजवा शेवटी त्यात गरम मसाला व कोथिंबिर मिक्स करा. परतुन झाल्यावर परत २-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा. हेही वाचा >> चमचमीत आणि चविष्ठ तंदूरी पापलेट फ्राय; जबरदस्त चव कधीच विसरणार नाही, नक्की ट्राय करा ४. गरमागरम मटरखिमा मटर बटर व कोथिंबिरीने गार्लिश करा सोबत लादीपाव कांदा टोमॅटो लिंबाने डिश सर्व्ह करा