Dry Fruits Modak: बाप्पाच्या प्रसादासाठी विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. त्यात तांदळाच्या उकडीचे मोदक घरोघरी आवर्जून बनवले जातात. पण, आज आम्ही तुम्हाला ड्रायफ्रूट्सचा मोदक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती
ड्रायफ्रूट्सचा मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी बदाम
- २ वाटी काजू
- १ वाटी पिस्ता
- १ अक्रोड
- १ वाटी खजूर (बिया काढून, बारीक केलेले)
- १/२ वाटी अंजीर (बारीक केलेले)
- ३-४ चमचे तूप
ड्रायफ्रूट्सचा मोदक बनवण्याची कृती:
हेही वाचा: बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बुंदीचा मोदक; नोट करा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड भाजून घ्या आणि नंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र करून त्याची बारीक पूड तयार करून घ्या.
- खजूर आणि अंजीर बारीक करून घ्या.
- आता एका कढईत तूप गरम करून त्यात बारीक केलेल्या ड्रायफ्रूट्सचे मिश्रण, खजूर, अंजीर आणि इतर साहित्य घाला.
- सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काही मिनिटं परतून घ्या.
- आता हे मिश्रण गरम असतानाच मोदकाच्या साच्याने त्याचे मोदक बनवून घ्या.