Oreo Fried Bites Recipe: आजकाल सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या फूड ट्रेंड्समध्ये ओरिओ फ्राईड बाइट्स खूप लोकप्रिय झाले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून गरम, मेल्ट झालेलं चॉकलेट-हा कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतो. मुलांसाठी तर ही एक परफेक्ट ट्रीट आहे, पण मोठ्यांनाही तेवढीच आवडते.

विशेष म्हणजे, ही रेसिपी खूप कमी वेळात आणि अगदी सोप्या साहित्यामध्ये तयार होते. अचानक काहीतरी गोड खायची इच्छा झाली किंवा पार्टीसाठी वेगळा डेसर्ट हवा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल!

आजच्या फास्ट लाइफस्टाइलमध्ये झटपट आणि टेस्टी रेसिपीजची मागणी वाढत चालली आहे. अशा वेळी कमी मेहनतीत तयार होणारे आणि दिसायलाही आकर्षक असे डेसर्ट लोकांना जास्त आवडतात. ओरिओ फ्राईड बाइट्स ही तशीच एक ट्रेंडी आणि इंस्टाग्राम-फ्रेंडली रेसिपी आहे, जी पाहुण्यांसमोर सर्व्ह केली तर लगेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये एकदा नक्की ट्राय करून पाहा!

साहित्य:

  • 1 पॅकेट ओरिओ बिस्किट
  • 1 कप पॅनकेक बॅटर (किंवा मैदा + दूध मिश्रण)
  • 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • 1/2 कप दूध
  • 1 टेबलस्पून साखर
  • तळण्यासाठी तेल

कृती:

  1. एका बाउलमध्ये मैदा, दूध, साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून स्मूद बॅटर तयार करा.
  2. कढईत तेल गरम करा.
  3. प्रत्येक ओरिओ बिस्किट बॅटरमध्ये dip करा.
  4. गरम तेलात हे बिस्किट सोडून सोनेरी होईपर्यंत तळा.
  5. बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवा.
  6. गरमागरम सर्व्ह करा (वरून चॉकलेट सॉस घातला तर अजून मस्त लागतो).
हेही वाचा

सर्व्हिंग टिप:

वरून पावडर साखर किंवा चॉकलेट सिरप घातल्यास taste next level होते