Palak Idli Marathi Recipe : चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या आपल्या आहारात समावेश करणे अत्यंत गरजेच्या आहेत. अशात पालक ही सर्वांनाच आवडते. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना पालकची भाजी किंवा पालकपासून बनविलेले पदार्थ खूप आवडतात. तुम्ही आजवर पालकची भाजी, पालक पराठा, पालक पनीर, पालक भजी इत्यादी पदार्थ खाल्ले असेल पण तुम्ही कधी पालक इडली खाल्ली आहे का? हो, पालक इडली. ही रेसिपी बनवायला अत्यंत सोपी असून खायला सुद्धा अत्यंत चविष्ठ वाटते. ही पालक इडली तुम्ही मुलांना टिफीनवर देऊ शकता किंवा सकाळी पौष्टीक नाश्ता खायचा असाल तर हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट वेळेवर होणारा हा पदार्थ तुम्ही कधीही बनवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही रेसिपी बनवायची कशी तर त्यासाठी तुम्हाला खालील रेसिपी नोट करावी लागेल. (Palak Idli Recipe In Marathi)

हेही वाचा : रात्रीच्या जेवणाचा चमचमीत बेत; रुचकर मऊ आणि लुसलुशीत गाजराचा भात, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी

साहित्य

 • तेल
 • लसूण
 • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • पालकची पाने
 • बर्फाचे तुकडे
 • रवा
 • दही
 • मीठ
 • इडली पात्र
 • इनो

हेही वाचा : संध्याकाळी चहाबरोबर चटपटीत अन् हेल्दी मखाणा भेळ खा, एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या रेसिपी, Video Viral

कृती

 • सुरुवातीला एका कढईत तेल गरम करा.
 • गरम तेलामध्ये लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाका.
 • चांगले परतून घ्या
 • त्यानंतर बारीक चिकलेली पालकची पाने टाका.तीन ते चार मिनिटे शिजून घ्या.
 • त्यानंतर ही पालक मिक्सरमधून बारीक करा.
 • त्यानंतर दोन तीन लहान बर्फाचे तुकडे त्यात टाका किंवा थंड पाणी टाका आणि पुन्हा मिक्सरमधून बारीक करा.
 • एक कप रवा घ्या
 • त्यानंतर त्यात दही टाका आणि सुजीमध्ये चांगले एकत्रित करा.
 • त्यानंतर त्यात बारीक केलेली पालक टाका. त्यानंतर थोडे पाणी टाका.
 • त्यानंतर त्यात मीठ टाका.
 • त्यानंतर हे मिश्रण १५ ते २० मिनिटे ठेवा.
 • त्यानंतर इडली पात्र घ्या.
 • त्यानंतर इडली प्लेट्सवर थोडे थोडे तेल लावा.
 • त्यानंतर २० मिनिटानंतर पालक रवा मिश्रणामध्ये इनो टाका आणि एक चमचा पाणी टाका. मिश्रण एकत्र करा.
 • त्यानंतर हे मिश्रण इडली प्लेट्सवर टाका
 • इडली पात्रामध्ये या इडली प्लेट्स ठेवा आणि २० मिनिटे शिजवून घ्या.
 • त्यानंतर शिजवल्यानंतर १० मिनिटे इडली थंड होऊ द्या.
 • आणि त्यानंतर इडली प्लेट्समधून इडली काढा.
 • पालक इडली तयार होईल. ही पालक इडली तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.