Paneer Paratha Recipe : सोशल मीडियावर नवनवीन रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही रेसिपीचे व्हिडीओ खूप हटके असतात. तुम्हाला पनीरपासून तयार केलेले पदार्थ आवडतात का? पनीर पुलाव, पनीरची भाजी, पालक पनीर, मिक्स पनीर वेज इत्यादी. पदार्थ आपण दररोज खातो. पण तुम्ही पनीर पराठी घरी तयार करून खाल्ला आहे का? हिवाळ्यात गरमा गरम पराठा खायला सर्वांना आवडतो. पनीर पराठी खायचा असेल तर आपण अनेकदा बाहेर खायला जातो पण आज आपण घरच्या घरी पनीर पराठा कसा तयार करायचा, हे जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पनीर पराठ्याची अगदी सोपी रेसिपी सांगितली आहे. (Paneer Paratha Recipe How to make Paneer paratha video goes Viral on social Media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – ((Paneer Paratha Recipe Video)

paneer viral video
तुम्ही खात असलेलं पनीर चांगल की बनावट? ओळखायचं कसं, पाहा VIDEO
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Masale Bhaat Recipe
Masale Bhaat Recipe : घरीच बनवा लग्नसमारंभात बनवला जाणारा मसाले भात, अगदी सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO

साहित्य

  • पनीर
  • कोथिंबीर
  • धनेपूड
  • जिरेपूड
  • चिली फ्लेक्स
  • ओवा
  • मीठ
  • गव्हाचे पीठ
  • तूप

हेही वाचा : चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

कृती

  • सुरुवातीला पनीरचे बारीक तुकडे करा.
  • त्यानंतर त्या पनीरच्या तुकड्यांमध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका
  • त्यानंतर त्यात धनेपूड, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, ओवा आणि चवीनुसार मीठ टाका.
  • सर्व मिश्रण एकजीव करा आणि हाताने सर्व गोष्टी कुस्कुरून घ्या आणि याचे बारीक मिश्रण करा.
  • त्यानंतर गव्हाचे पीठ मळून घ्या आणि त्याचा गोळा करून जाडसर पोळी लाटून घ्या.
  • त्यानंतर हे पनीरचे मिश्रण त्या पोळीवर टाकून पोळी चारही बाजून पॅक करा. त्यानंतर चौकोन आकाराचा पराठा लाटून घ्या. तुपाने दोन्ही बाजूने पराठा तव्यावर भाजून घ्या.
  • हा गरमा गरम पनीर पराठा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Kaju Biscuit : चहाबरोबर नेहमीची बिस्किटे खाऊन कंटाळा आलाय? मग घरच्या घरी काजूपासून बनवा बिस्किट; वाचा सोपी रेसिपी

namaste_nibbles या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पनीर पराठा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला खूप आवडतो.” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम.. मी नक्की ट्राय करेन.. खूप सोपी आहे..” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप चविष्ठ आहे अनेकांना ही चविष्ठ रेसिपी आवडली आहे..

Story img Loader