Paneer Schezwan Dry Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी स्टार्टर्सची पनीरची रेसिपी जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे ‘पनीर शेजवान ड्राय’.

हेही वाचा… Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती

AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

साहित्य

  • 250 ग्राम पनीर (कापलेले)
  • 2 बारीक चिरलेला कांदा
  • 1 चमचा लाल तिखट पावडर
  • 1 चमचा मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • 3 चमचे चिंग्स शेजवान चटणी / सॉस
  • 2 चमचे मैदा आणि कॉर्नफ्लोर
  • तळण्यासाठी तेल

हेही वाचा… Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी

कृती

  1. पनीरचे बारीक तुकडे करा. त्यात लाल तिखट पावडर, मिरी पावडर, मीठ, मैदा आणि कॉर्नफ्लोर घाला. सर्व साहित्य नीट एकत्र करा जेणेकरून पनीरचे तुकडे पूर्णपणे कोट होतील.
  2. तळण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यात पनीरचे तुकडे हळू हळू टाका आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
  3. दुसऱ्या कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले कांदे टाका आणि ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. आता त्यात चिंग्स शेजवान चटणी / सॉस घाला आणि तळलेले पनीरचे तुकडे टाका. सर्व मिश्रण छान हलवून पनीर चांगले सॉसने कोट करा. आवश्यक असल्यास मीठ घाला.
  4. कांद्याची पात किंवा कोथिंबीर टाकून सजवा.
  5. गरमागरम सर्व करा, हे स्टार्टर्स किंवा साइड डिश म्हणून भात किंवा नूडल्स सोबत सर्व करता येईल.

Story img Loader