Poha Bhaji Recipe : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात गरमा गरम भजी खाण्याचा मोह आवरत नाही. तुम्ही जर कांदा भजी किंवा बटाटा भजी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला आणखी एक भजीचा प्रकार सांगणार आहोत. तुम्ही कधी पोह्यांची भजी खाल्ली आहेत का? अनेक जण पोहे हे फक्त नाश्त्यामध्ये खातात पण तुम्हाला माहिती आहे का पोह्यांची भजी चवीला अप्रतिम असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोह्यांची भजी कशी बनवायची, याविषयी सांगताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

What Sanjay Raut Said About Devendra Fadnavis?
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं राज्य लयाला नेणाऱ्या पेशवाईचे..”, संजय राऊत यांची टीका
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
IC 814
“भोला, शंकर…”, अशी दहशतवाद्यांची नावे बदलल्याने ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’वर नेटकऱ्यांचा आक्षेप; म्हणाले, “तथ्यांचा…”
Ajit Pawars confession says Loksabha election caused displeasure of farmers
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवली; अजित पवारांची कबुली, म्हणाले ‘कापूस, सोयाबीनला…’
elder couple went to eat vada pav Thief stole jewellery,bag
पुणे : वडापाव पाच लाखांना; ज्येष्ठाकडील दागिन्यांची पिशवी लंपास, हडपसर भागतील घटना
Kangana Ranaut seeks help from mamata banerjee
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’चे दिग्दर्शक बेपत्ता, कंगना रणौत ममता बॅनर्जींना म्हणाल्या, “तुमच्या सरकारने त्यांच्यावर…”
14 lakh fraud of women by cyber thieves pune news
सायबर चोरट्यांकडून महिलांची १४ लाखांची फसवणूक
sanjay raut on bjp marathi news
“देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र…”, खासदार संजय राऊत यांचा टोला

कुरकुरीत पोह्यांची भजी

साहित्य :

पोहे
बेसन
तांदळाचे पीठ
मिरची
बारीक चिरलेला कांदा
कढीपत्ता
लसूण
हळद
मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
ओवा
तेल

हेही वाचा : सुख म्हणजे आणखी काय असतं..! पावसात चहासोबत ‘ही’ वेगळ्या पद्धतीची कांदा भजी खाल्ली? पाहा झटपट रेसिपी

कृती :

सुरुवातीला एक वाटी पोहे भिजवून घ्या.
त्यात अर्धी वाटी बेसन पीठ टाका.
त्यानंतर त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ टाका.ॉ
त्यानंतर चार बारीक चिरलेली मिरची टाका.
त्यानंतर त्यात थोडा कढीपत्ता टाका.
त्यात बारीक चिरलेल्या लसणाच्या कळ्या टाका.
उभा पातळ चिरलेला एक कांदा त्यात टाका
त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
त्यात ओवा, हळद, मीठ टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करा.
त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून मिश्रण घट्टसर असे भिजवून घ्या.
त्यानंतर तेल गरम करा आणि गरम तेलातून या मिश्रणाचे भजी तळून घ्या.
कमी आचेवर ही भजी तळून घ्या.
गरमा गरम पोह्यांची भजी तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Manchurian Paratha: नाश्त्याला करा चविष्ट ‘मंच्युरियन पराठा’ ; पौष्टीक पदार्थ फक्त दहा मिनिटांत बनवा; रेसिपी लिहून घ्या

apalimavashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्याता आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावरान पद्धतीने चुलीवर बनवलेले पोह्याचे भजी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मावशी खूप छान झाली भजी” तर एका युजरने लिहिलेय, “चुलीवरच्या जेवणाची मजा च वेगळी आहे पण आम्हा शहरवाल्यांना त्याची मजा घेता येत नाही”

या महिलेचे आपली मावशी या नावाने इन्स्टाग्राम आणि युट्युब अकाउंट आहे. या अकाउंटवर त्या नवनवीन चुलीवर बनवलेल्या पदार्थांच्या रेसिपी सांगतात. त्यांच्या प्रत्येक रेसिपी लोकांना खूप आवडतात. युजर्स त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.