सकाळ आणि संध्याकाळच्या चहाबरोबर अनेकांना काहीतरी चमचमीत, कुरकुरीत आणि खमंग खाण्याची इच्छा असते. अशावेळी तुम्ही दुकानातून विकत आणलेले वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, चकली, बिस्किट्स खाता. पण, अनेकदा घरी बनवलेला खमंग, रुचकर पदार्थ खावासा वाटतो. विशेषत: चहाबरोबर अनेक जण खुसखुशीत चकली आवडीने खातात. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक वाटी पोह्यांपासून अगदी २० मिनिटांत तयार होणारी खमंग कुरकुरीत ‘काटेरी चकली’ ची सोप्पी रेसिपी सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला भाजणी किंवा जास्त काही पसारा करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे अगदी कमी वेळात तयार होणारी ही ‘काटेरी चकली’ ‘कशी बनवतात पाहू…

पोह्याची चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१) पोहे – १ वाटी
२) तांदळाचे पीठ – १ ते दीड कप
३) भाजलेली चणा डाळ – अर्धा कप
४) लाल तिखट – १ टेबलस्पून
५) हळद – १ टीस्पून-
६) धणे पावडर – १ टेबलस्पून
७) ओवा – अर्धा टीस्पून
८) जिरेपूड – अर्धा टीस्पून
९) तीळ – २ टीस्पून
१०) तेल – तळण्यासाठी
११) हिंग – पाव टीस्पून
१२) मीठ – चवीपुरते
१३) पाणी – गरजेनुसार

पोह्यांची इन्स्टट चकली बनवण्याची कृती (Instant Poha Chakali Recipe in Marathi)

पोह्यांची चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीभर पोहे आणि भाजलेली चण्याची डाळ मिक्सरमध्ये वाटून त्याचे पीठ करून घ्या. यानंतर तयार पीठ परातीत चाळून घ्या आणि त्यात तांदळाचे पीठ आणि सर्व मसाले घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

आता त्यात तीळ, जिरं घालून तेलाचे मोहन घाला आणि पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. १० मिनिट हे सर्व असंच झाकून ठेवा, त्यानंतर पिठात थोडं थोडं पाणी घालून पिठाचे छान गोळे मळून घ्या.

पिठाचा गोळा नीट तयार झाल्यानंतर चकलीचा आकार बनवण्याच्या भांड्यात मावेल इतका गोळा भरा आणि चकल्या करून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता कढईतील तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर एकामागोमाग एक चकल्या टाकून तळून घ्या. चकली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी कुरकुरीत चकल्या बनवू शकता.