scorecardresearch

Premium

Puri Recipe : या’ ५ चुका टाळा अन् बनवा टम्म फुगणाऱ्या कमी तेलकट पुऱ्या, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही टम्म फुगणाऱ्या आणि कमी तेलकट पुऱ्या बनवू शकता.चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.

Puri Recipe
Puri Recipe : या' ५ चुका टाळा अन् बनवा टम्म फुगणाऱ्या कमी तेलकट पुऱ्या, नोट करा रेसिपी (photo : hearty_meals_withsmi/ instagram)

Puri Recipe : पुरी असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. अनेकजण पुऱ्या तेलकट असतात म्हणून खाणे टाळतात पण आज आम्ही तुम्हाला परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही टम्म फुगणाऱ्या आणि कमी तेलकट पुऱ्या बनवू शकता.चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.

साहित्य

  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • तेल
  • पाणी

हेही वाचा : Kohlyache Bond : विदर्भातील पारंपारिक कोहळ्याचे बोंड, जाणून घ्या ही हटके रेसिपी

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…
New car maintenance tips
Car tips : नवीन गाडी घेतल्यावर ‘या’ चुका करू नका! वाहनाची काळजी कशी घ्यावी पाहा

कृती

  • गव्हाच्या पीठात चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून घट्टसर मळून घ्या.
  • कणीक मळल्यानंतर १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
  • छोटे छोटे गोळे करायचे आणि पुऱ्या लाटून घ्याव्यात.
  • त्यानंतर मध्यम ते जास्त आचेवर पुरी तळून घ्याव्यात.

टिप्स :

टीप १ – कणीक मळताना मोहन घालायचं नाही. गरम तेल किंवा थंड तेल टाकायचं नाही.
टीप २ – कणीक सैल मळायची नाही. कारण नंतर त्याला पीठ लावावं लागतं ज्यामुळे पुरी तेल जास्त शोषून घेते आणि पुरी तेलकट होते.
टीप ३ – कणीक मुरल्यानंतर पुरी लाटायची घाई करायची नाही. कणीकीचा गोळा आणखी चांगला मळून घ्यावा.
टीप ४ – पुरी लाटताना तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही.
टीप ५ – पुरी तळताना सुरुवातीला एकच बाजू चांगली तळून घ्यायची पुरी फुगल्यावर नंतर दुसऱ्या बाजूने फिरवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Puri recipe how to make puffy and soft puri know the perfect method and avoid these mistakes ndj

First published on: 24-11-2023 at 13:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×