शुभा प्रभू-साटम

साहित्य – भाजलेला रवा अर्धी वाटी, पाव वाटीपेक्षा कमी दही, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर बारीक चिरलेली, चाट मसाला, लिंबू रस, मीठ, साखर, ब्रेड.

याचप्रमाणे पुढील साहित्य ऐच्छिक- उकडून किसलेला बटाटा/ किसलेला कोबी/ गाजर/ बारीक चिरलेली शिमला.

कृती – रव्यामध्ये दही आणि बाकीचे सर्व साहित्य मिसळावे. हे सगळे छान एकजीव करून दहा मिनिटांसाठी ठेवून द्यावे. मिश्रण फार घट्टही नको नि फार पातळही नको. तव्यावर लोणी वितळायला ठेवावे. त्यानंतर ब्रेडच्या तुकडय़ांना रव्याचे मिश्रण लावावे. ती बाजू छान लालसर शेकून घ्यावी. नंतर दुसरी बाजू भाजावी. हवे असल्यास वरून चीजही किसून टाकता येईल.