Ragi Vadi Recipe: नाचणीला अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक पोषकद्रव्यं असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणी-सोयाबीनचा वडी कशी करतात हे सांगणार आहोत.

नाचणीची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ कप नाचणीचे पीठ
  • २ कप सोयाबीनचे पीठ
  • १ कप तूप
  • १/२ कप जाड पोहे
  • १/२ कप डिंक
  • १/२ कप जाड किसलेलं सुकं खोबरं
  • १ चमचा वेलची पावडर
  • ४ कप गूळ

नाचणीची वडी बनवण्याची कृती:

हेही वाचा: २ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
  • सर्वात आधी कढईत तूप वितळवून त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्या.
  • त्यानंतर एका ताटात या दोन्ही गोष्टी काढून चुरून घ्या.
  • आता त्याच तुपात नाचणीचे पीठ आणि सोयाबीनचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. गरज लागल्या त्यात आणखी तूप घाला.
  • आता ३ चमचे पाणी आणि किसलेला गूळ आणि एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा.
  • गूळ पूर्ण वितळला की एक उकळी येऊ द्यावी आणि त्यात भाजलेले पीठ, डिंक, पोहे, खोबरं, आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
  • हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतून त्याच्या वड्या पाडा.
  • तयार नाचणीच्या वडीचा आस्वाद घ्या.

Story img Loader